करिअर मार्गदर्शन मेळावा-2023..!!
MKCL सिंधुदुर्ग व रोटरी क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य आयोजन..!!
विशेष वृत्त : देवेंद्र गावडे : उपसंपादक :- सध्याच्या तंत्रज्ञानाचा अंतर्भाव झाल्यामूळे गतीमान झालेल्या आयुष्याचा ‘वेग’ साधताना भल्याभल्यांची दमछाक होताना दिसते आहे. तीथे विद्यार्थ्यांची पर्यायाने आपल्या देशाची भावी पिढी असलेल्या विद्यार्थ्यांची स्वतःच्या आयुष्याच्या भावी यशस्वी वाटचालीसाठी आवश्यक असणा-या योग्य ‘करिअर’ची निवड करताना देखील भलतीच त्रेधातिरपिट उडताना दिसतेय.नेमकं काय केल्याने आणि कशाप्रकारे केल्याने आपलं ‘करिअर’ यशस्विरितीने घडेल या बाबतची संभ्रमावस्था विद्यार्थ्यांमध्ये जाणवते आहे.याच सर्व प्रश्नांची..आणि विद्यार्थ्यांच्या मनात असलेल्या ‘करिअर’ विषयक संभ्रमावस्थेची उकल करून त्यांना त्यांच्या भविष्याचा योग्य ‘राजमार्ग’ निवडता यावा या उद्देशाने MKCLच्या सिंधुदुर्ग विभागामार्फत भव्य अशा करिअर मेळाव्याचे आयोजन केले जाते.यावर्षीदेखील, MKCL सिंधुदुर्ग विभाग व रोटरी क्लब-सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार, दिनांक 1 जुलै, 2023 रोजी कुडाळ येथील सिद्धिविनायक हाॅलमध्ये सकाळी 9.00 ते सायं. 5.00 या वेळेमध्ये करिअर विषयक मार्गदर्शन मेळावा..’ उमंग ‘..या वैशिष्ट्यपूर्ण मार्गदर्शनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे.’ उमंग ‘..सळसळता उत्साह..चैतन्य..हाच उत्साह..हेच चैतन्य विद्यार्थ्यांच्या मनात जागवून, कोविडसारख्या वेदनादायी काळानंतर आलेली निराशा झटकून..विद्यार्थ्यांनी पून्हा नव्या जोमाने आपल्या यशस्वी करिअरसाठी झटावे व आपले उज्वल भवितव्य घडवावे, हाच या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश असल्याचे MKCL सिंधदुर्ग जिल्हा समन्वयक श्री. प्रणय तेली सर सांगतात. ते स्वतः रोटरी सारख्या सामाजिक संस्थेमध्ये देखील महत्वाचा पदभार सांभाळत आहेत.*..लाखो रूपयांच्या पारितोषिकांची लयलूट करण्याची संधी उपलब्ध करून देणारा..एकमेव करिअर मार्गदर्शन मेळावा..!!*या मेळाव्याआधी नेहरू युवा केंद्र व MKCLच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी ‘कॅश द रेन’ ही स्पर्धात्मक ‘ई टेस्ट’ घेण्यात येणार आहे. यामध्ये सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांमधून प्रत्येक तालुक्यामधून प्रत्येकि तीन क्रमांक काढण्यात येणार आहेत व त्यांना रोख स्वरूपातील पारितोषिके देखील प्रदान करण्यात येणार आहेत.*..मराठा व कुणबी प्रवर्गातील आर्थिक मागास गटातील विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्र शासनाचा ‘सारथी’ उपक्रम..!!*सिंधुदुर्ग जिल्ह्यातील MKCLच्या अधिकृत मान्यताप्राप्त संस्थांमध्ये महाराष्ट्र शासनाच्या ‘सारथी’ या उपक्रमाद्वारे तब्बल 270 विद्यार्थी, 6 महिने कालावधीचा व तब्बल 20000/- रू. प्रशिक्षण मुल्य असणा-या ‘डिप्लोमा’चा..अगदी ‘मोफत’ स्वरूपात लाभ घेत आहेत.वर्ष 2023 मधील या योजने अंतर्गत शेवटच्या बॅचसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. याविषयीच्या अधिक माहितीसाठी नजिकच्या अधिकृत कंप्यूटर प्रशिक्षण संस्थांशी संपर्क साधावा असे आवाहन सारथी संस्था व MKCL सिंधुदुर्गच्या वतीने करण्यात आले आहे.*..” उमंग ” ..कार्यक्रमाची रूपरेषा :*शनिवार, 1 जुलै रोजी सकाळी ठीक 9.00 वाजता..” उमंग ” या बहूआयामी करिअर मार्गदर्शन मेळाव्याचा उद्घाटन सोहळा मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत पार पाडला जाईल.याप्रसंगी प्रमुख उपस्थिती डाॅ. अमेय देसाई, मुंबई शहरातील वैद्यकिय क्षेत्रातील नामवंत डाॅक्टर, कुडाळचे तहसिलदार श्री. अमोल पाठक साहेब तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. सौरभ अग्रवाल, जिल्हा पोलीस अधिक्षक, सिंधुदुर्ग यांच्या हस्ते या कार्यक्रमाचे उद्घाटन होईल.त्याचबरोबर तहसिलदार साहेबांच्या हस्ते ‘सारथी’ योजने अंतर्गत लाभार्थी विद्यार्थ्यांना प्रवेशपत्र सुपुर्त करण्यात येईल. तहसिलदार साहेब उपस्थित विद्यार्थी वर्गाला मार्गदर्शन करतील.तहसिलदार साहेबांच्या मार्गदर्शनपर सत्रानंतर सन्माननीय आयएएस् ऑफिसर श्री. विशाल खत्री सर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतील. याप्रसंगी विद्यार्थ्यांना MKCLच्या MFS प्रवेशपत्रांचे वितरण करण्यात येईल. MFSद्वारे उच्चशिक्षण घेता घेता स्वकमाई व नोकरीविषयक स्वानुभव मिळवण्याची बहुमोल संधी आज प्राप्त झाली आहे. जिल्हाभरातील अनेक विद्यार्थ्यांना याचा लाभ घेत आहेत.MKCLच्यावतीने विविध क्षेत्रांमध्ये करिअर घडवू इच्छिणा-या विद्यार्थ्यांसाठी करिअरसाठी पुरक अशी ‘क्लिक कोर्सेस्’ची मालिका सुरू करण्यात आली आहे. नेमेक हे कोर्सेस् कशा प्रकारचे आहेत..आणि विद्यार्थ्यांना त्याचा कसा फायदा होणार आहे, याविषयी MKCLचे जनरल मॅनेजर श्री. नटराजन कटकधोंड सर मार्गदर्शन करतील.पुढच्या सत्रामध्ये इव्हेंट चेअरमन, गव्हर्नर एरिया एड रोटरी डिस्ट्रिक्ट् 3170 तथा MKCL सिंधुदुर्ग जिल्हा समन्वयक श्री. प्रणय तेली सर ‘ व्यक्तिमत्व विकास व यशस्वी करिअर निवड ‘ या विषयावर मार्गदर्शन करतील.मध्यांतरामध्ये विद्यार्थ्यांना मनोरंजनात्मक अशा ‘प्रश्नमंजूषा’ कार्यक्रमामध्ये सहभागी होऊन पारितोषिके जिंकण्याची संधी देखील प्राप्त होणार आहे.’कॅश द रेन’ या विद्यार्थ्यांसाठी घेण्यात आलेल्या ‘ई’ टेस्टच्या विजेत्या विद्यार्थ्यांना पारितोषिके वितरीत करण्यात येणार आहेत. इंग्रजी भाषेवर प्रभुत्व मिळवण्यासाठी आवश्यक असणारा क्लिक इंग्लिश कोर्स, साॅफ्ट स्किल्स कोर्स आणि तसेच प्रत्येक सहभागी विद्यार्थ्यांना सर्टिफिकेट् व प्रोत्साहनपर क्लिक अवाॅर्ड दिले जाईल.जिल्ह्यातील प्रमुख महाविद्यालयाचे प्रतिनिधी देखील या कार्यक्रमामध्ये सहभागी होऊन विद्यार्थ्यांना महाविद्यालयांची किचकट वाटणारी प्रवेश प्रक्रिया अगदी सोप्या पद्धतीने कशी पूर्ण करता येईल याचे मार्गदर्शन करतील.शिकता शिकता कमवण्याची संधी उपलब्ध करून देणा-या MFSचं नेमकं स्वरूप कस आहे हे उलगडून सांगतील MKCLचे रिजनल मॅनेजर श्री. तुषार निकम सर.कार्यक्रमाच्या शेवटच्या सत्रामध्ये प्रमुख वक्ते ज्येष्ठ अर्थतज्ञ, मोटिव्हेशनल स्पिकर तथा रोटरीयन व प्रसिद्ध व्याख्याते श्री. किशोर लुल्ला समस्त विद्यार्थी व पालक वर्गास प्रेरणादायी व यशस्वी आयुष्याच्या वाटचालीसाठी आवश्यक बहुमोल मार्गदर्शन करतील.त्याचबरोबर कोंकण विभाग MKCLचे ज्येष्ठ मार्गदर्शक श्री. जयंत भगत सर..श्री. दिपक बेलवलकर असिस्टंट गव्हर्नर, रोटरी डिस्ट्रिक्ट् 3170..श्री. अमित वळंजू, रोटरी क्लब ऑफ कुडाळचे अध्यक्ष..आणि श्री. मंगेश जाधव, MKCL कोंकण विभाग समन्वयक..या सर्व मान्यवरांचे देखील बहुमोल विचार व मार्गदर्शन ऐकावयास मिळणार आहे.कार्यक्रमाची सांगता विद्यार्थी वर्गास साहित्य वितरण व आभार प्रदर्शनाने होईल.करिअर मेळाव्यामध्ये सहभागी प्रत्येक विद्यार्थ्यास आकर्षक प्रमाणपत्र व क्लिक अवार्ड देण्यात येणार आहे.एवढ्या मोठ्या स्वरूपाचा व राज्यभरातील महान हस्तींचा सहभाग असणारा हार करिअर मार्गदर्शन मेळावा विद्यार्थ्यांच्या जिवनामध्ये नवचैतन्य म्हणजेच एक नवी..’ उमंग ‘..जागवेल असा विश्वास आयोजकांकडून व्यक्त केला जात आहे. या करिअर मार्गदर्शन मेळाव्याचा सिंधुदुर्ग जिल्हाभरातील तमाम विद्यार्थी व पालकवर्गाने अवश्य लाभ घ्यावा.
===/====/======
*आयोजक,**MKCL, सिंधुदुर्ग परिवार..आणि रोटरी क्लब ऑफ कडाळ