मालवण | सुयोग पंडित : सहकारी प्रणाली साठी सुप्रसिद्ध अशा ‘कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ’ अर्थात ‘गोकुळ’च्या चेअरमनपदी ज्येष्ठ संचालक अरुणराव डोंगळे यांची निवड झाल्यानंतर ते प्रथमच काल सिंधुदुर्ग जिल्ह्यात आले असताना आमदार वैभव नाईक यांनी त्यांच्या कणकवलीतील निवासस्थानी त्यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. आमदार वैभव नाईक यांनी श्री. अरूणराव डोंगळे यांचे अभिनंदन करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी जिल्ह्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांचे प्रश्न व जिल्ह्यातील दुध उत्पादनाबाबत दोन्ही मान्यवरांमध्ये चर्चा झाली.