27.4 C
Mālvan
Monday, April 7, 2025
IMG-20240531-WA0007

आचिर्णे येथे दुर्गाडी विकास मंडळाचे वतीने कृषी सेवा पुरस्कार सोहळा संपन्न ; पारंपरिक शेतीचा व कृषकाचा अनोखा सन्मान.

- Advertisement -
- Advertisement -

दिवंगत व्यंकोजी लक्ष्मण रावराणे यांचे स्मरणार्थ पुरस्कार.

नवलराज काळे | सहसंपादक : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आचिर्णे येथे दुर्गाडी विकास मंडळाचे वतीने आज ‘कृषी सेवा पुरस्कार’ सोहळा संपन्न झाला. या सोहळ्याला लहानपणापासून पारंपारिक शेती,पाण्याचा स्रोत झाल्यानंतर ऊस उत्पादन, फलोत्पादन, विविध संस्थामध्ये क्रियाशीलपणे कार्यरत असलेले आक्रमक व लढाऊ लोकनेते व ‘आबा’ या टोपणनावाने पंचक्रोशीत प्रसिद्ध असलेले तसेच मंडळाच्या स्थापनेपासून क्रियाशील सहभाग घेऊन मंडळाचे सल्लागार असणारे श्री.मोहन सखाराम रावराणे हे प्रमुख पाहुणे म्हणून लाभले. त्यांच्या हस्ते सत्कार मूर्ती श्री.बाबला बाबू शिंगाडे यांना शाल, फेटा, खादीचा हातरूमाल व गौरवपत्र देऊन गौरविण्यात आले.

श्री.बाबलू बाबू शिंगाडे यांनी आपल्या संपूर्ण आयुष्यात पारंपारिक पद्धतीने आपली वडिलोपार्जित शेती जोपासली. त्याचबरोबर गुरे-ढोरे सांभाळत शेळीपालन ही केले. सर्वात महत्वाचे म्हणजे पहिली १० वर्षे विद्यमान मंडळाच्या ‘दुर्गाडी दर्शन सोहळा’ या उपक्रमात दुर्गाडीचा परिसर स्वतः पायी फिरून दाखविला. धनगरी नृत्य गज्जा यातही त्यानी लोककलावंत म्हणून काम करून आपली पारंपारिक कला जोपासली. त्यांच्यामुळे दुर्गाडी डोंगराच्या संदर्भातील अनेक गोष्टींचा,पायवाटांचा, विशिष्ट जागांचा,वनौषधी वनस्पती आणि झाडाझुडपांचा उलगडा झाला. त्यांनी याकामी मोलाचे मार्गदर्शन केले.त्याबद्दल ‘श्री.भैरीभवानी कृषी व फलोद्यान विकास सहकारी संस्था (नियोजित) यांच्या सौजन्याने ‘दिवंगत व्यंकोजी लक्ष्मण रावराणे’ यांचे स्मरणार्थ मंडळाच्या वतीने त्यांना गौरवपत्र देऊन कृषी सेवा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

तसेच आपली पारंपारिक शेती जोपासत स्वतःच्या घरात जेवण बनवून पर्यटकांना जेवू घालणारे तसेच पहिली पाच वर्षे व्यवस्थापक म्हणून काम केलेले श्री.विठ्ठल जठू हुंबे यांचा शाल व खादीचा रुमाल देवून सत्कार करण्यात आला. आजच्या कार्यक्रमाला श्री.लक्ष्मण पुरुषोत्तम रावराणे अध्यक्ष म्हणून लाभले.यांचा मंडळाच्या कार्यात सुरुवातीपासूनच क्रियाशील सहभाग आहे. गेली दहा वर्षे एकहाती दुर्गाडी दर्शन सोहळा कार्यक्रम करत आहेत. पारंपारिक शेती,उस उत्पादक तसेच प्रथितयश बांधकाम ठेकेदार आहेत. ग्राम पंचायत आचिर्णे सदस्य,मा.सभापती पंचायत समिती वैभववाडी अशी राजकीय कारकीर्द आहे. त्यांचाही सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन सचिन हुंबे, परिचय स्वप्नील दर्डे व आभार नागेश रावराणे यांनी मानले. कार्यक्रमाचे व्यवस्थापक म्हणून संजय पांगळे यांनी ऊत्तम नियोजन केले.कार्यक्रमास मंडळाचे सल्लागार श्री.मधुकर यशवंत रावराणे, रणजित रावराणे, सखाराम झोरे, राजा शिंगाडे, संतोष बोडके, विजय तेली , महेश रावराणे,सत्यवान पांगळे व इतर मान्यवर उपस्थित होते.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

दिवंगत व्यंकोजी लक्ष्मण रावराणे यांचे स्मरणार्थ पुरस्कार.

नवलराज काळे | सहसंपादक : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आचिर्णे येथे दुर्गाडी विकास मंडळाचे वतीने आज 'कृषी सेवा पुरस्कार' सोहळा संपन्न झाला. या सोहळ्याला लहानपणापासून पारंपारिक शेती,पाण्याचा स्रोत झाल्यानंतर ऊस उत्पादन, फलोत्पादन, विविध संस्थामध्ये क्रियाशीलपणे कार्यरत असलेले आक्रमक व लढाऊ लोकनेते व 'आबा' या टोपणनावाने पंचक्रोशीत प्रसिद्ध असलेले तसेच मंडळाच्या स्थापनेपासून क्रियाशील सहभाग घेऊन मंडळाचे सल्लागार असणारे श्री.मोहन सखाराम रावराणे हे प्रमुख पाहुणे म्हणून लाभले. त्यांच्या हस्ते सत्कार मूर्ती श्री.बाबला बाबू शिंगाडे यांना शाल, फेटा, खादीचा हातरूमाल व गौरवपत्र देऊन गौरविण्यात आले.

श्री.बाबलू बाबू शिंगाडे यांनी आपल्या संपूर्ण आयुष्यात पारंपारिक पद्धतीने आपली वडिलोपार्जित शेती जोपासली. त्याचबरोबर गुरे-ढोरे सांभाळत शेळीपालन ही केले. सर्वात महत्वाचे म्हणजे पहिली १० वर्षे विद्यमान मंडळाच्या 'दुर्गाडी दर्शन सोहळा' या उपक्रमात दुर्गाडीचा परिसर स्वतः पायी फिरून दाखविला. धनगरी नृत्य गज्जा यातही त्यानी लोककलावंत म्हणून काम करून आपली पारंपारिक कला जोपासली. त्यांच्यामुळे दुर्गाडी डोंगराच्या संदर्भातील अनेक गोष्टींचा,पायवाटांचा, विशिष्ट जागांचा,वनौषधी वनस्पती आणि झाडाझुडपांचा उलगडा झाला. त्यांनी याकामी मोलाचे मार्गदर्शन केले.त्याबद्दल 'श्री.भैरीभवानी कृषी व फलोद्यान विकास सहकारी संस्था (नियोजित) यांच्या सौजन्याने 'दिवंगत व्यंकोजी लक्ष्मण रावराणे' यांचे स्मरणार्थ मंडळाच्या वतीने त्यांना गौरवपत्र देऊन कृषी सेवा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

तसेच आपली पारंपारिक शेती जोपासत स्वतःच्या घरात जेवण बनवून पर्यटकांना जेवू घालणारे तसेच पहिली पाच वर्षे व्यवस्थापक म्हणून काम केलेले श्री.विठ्ठल जठू हुंबे यांचा शाल व खादीचा रुमाल देवून सत्कार करण्यात आला. आजच्या कार्यक्रमाला श्री.लक्ष्मण पुरुषोत्तम रावराणे अध्यक्ष म्हणून लाभले.यांचा मंडळाच्या कार्यात सुरुवातीपासूनच क्रियाशील सहभाग आहे. गेली दहा वर्षे एकहाती दुर्गाडी दर्शन सोहळा कार्यक्रम करत आहेत. पारंपारिक शेती,उस उत्पादक तसेच प्रथितयश बांधकाम ठेकेदार आहेत. ग्राम पंचायत आचिर्णे सदस्य,मा.सभापती पंचायत समिती वैभववाडी अशी राजकीय कारकीर्द आहे. त्यांचाही सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन सचिन हुंबे, परिचय स्वप्नील दर्डे व आभार नागेश रावराणे यांनी मानले. कार्यक्रमाचे व्यवस्थापक म्हणून संजय पांगळे यांनी ऊत्तम नियोजन केले.कार्यक्रमास मंडळाचे सल्लागार श्री.मधुकर यशवंत रावराणे, रणजित रावराणे, सखाराम झोरे, राजा शिंगाडे, संतोष बोडके, विजय तेली , महेश रावराणे,सत्यवान पांगळे व इतर मान्यवर उपस्थित होते.

error: Content is protected !!