क्रीडा | विशेष : यंदाच्या आयपिएलच्या छोटा पॅकेट बडा धमाका ठरलेल्या रिंकू सिंगची ३३ चेंडूत नाबाद ६७ धावांची झुंज क्रिकेट रसिकांच्या लक्षात राहील परंतु लखनौ आणि केकेआर यांच्याकील कालचा त्यांचा शेवटचा साखळी सामना भयानक अटीतटीचा ठरुनही केकेआर सामना जिंकू शकले नाही. लखनौने केकेआरपुढे जिंकण्यासाठी १७७ धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना त्यांनी चांगली सुरुवात केली होती.
लखनौने यावेळी एका धावेने सामना जिंकला आणि त्यांनी प्ले ऑफमध्ये आपले स्थान निश्चित केले आहे. लखनौच्या संघाने केकेआरपुढे विजयासाठी १७७ धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना केकेआरने चांगली सुरुवात केली होती. पण त्यांचे दोन्ही सलामीवीर बाद झाले आणि सामना त्यांच्या हातून निसटायला सुरुवात झाली. रिंकू सिंगने अर्धशतक झळकावले, पण त्याला संघाला विजय मिळवून देता आला नाही.
लखनौच्या १७७ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना कोलकाताला ६१ धावांची दमदार सलामी मिळाली. कारण वेंकटेश अय्यर आणि जेसन रॉय यांनी सुरुवातीपासून दमदार फटकेबाजी सुरु केली होती. या गोष्टीचा केकेआरला चांगलाच फायदा झाला. पण वेंकटेश अय्यर हा २४ धावांवर बाद झाला आणि केकेरला पहिला धक्का बसला. त्यानंतर काही वेळातच जेसन रॉयही बाद झाला. यावेळी त्याचे अर्धशतक पाच धावांनी हुकले, जेसनने २८ चेंडूंत सात चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर ४५ धावा केल्या. हे दोन्ही सलामीवीर बाद झाले आणि त्यानंतर केकेआरच्या संघाची पडझड सुरु झाली.
केकेआरच्या गोलंदाजांनी यावेळी लखनौला सुरुवातीपासून धक्के द्यायला सुरुवात केली. लखनौच्या संघाला तिसऱ्या षटकापासून एकामागून धक्के बसायला सुरुवात झाली. तिसऱ्या षटकात लखनौने आपला सलामीवीर करन शर्माला गमावले आणि त्यानंतर एकामागून एक फलंदाज बाद होत गेले. या सामन्यात लखनौचा अर्धा संघ ७३ धावांवर बाद झाला होता. त्यावेळी ते मोठी धावसंख्या उभारतील असेल वाटत नव्हते. पण त्यावेळी निकोलस पुरन लखनौच्या मदतीला धावून आला. यावेळी पुरनने ३० चेंडूंत चार चौकार आणि पाच षटकारांच्या जोरावर ५८ धावांची खेळी साकारली. पुरनच्या या खेळीच्या जोरावर लखनौच्या संघाला २० षटकांत ८ बाद १७६ अशी दमदार धावसंख्या उभारता आली होती.
लखनौला दुसरे स्थान पटकावून चेन्नईला तिसऱ्या स्थानी ढकलायचे असेल तर त्यासाठी एक समीकरण समोर आले होते. जर लखनौच्या संघाने २०० पेक्षा जास्त धावा केल्या आणि जर त्यांनी ९६ धावांनी विजय साकारला किंवा लखनौच्या संघाने जर २०० पेक्षा कमी धावा केल्या आणि जर त्यांनी ९७ धावांनी विजय साकारला तरच ते दुसऱ्या स्थानावर जाऊ शकत होते.