24.9 C
Mālvan
Friday, September 20, 2024
Download Aarti Sangrah
ASN Ganapati AD
IMG-20240531-WA0007

माजी खासदार डाॅ निलेश राणे इफेक्ट ; आचरा खार बंधार्याची नादुरुस्त झडपे लगेच दुरुस्त.

- Advertisement -
- Advertisement -

आचरा | ब्युरो न्यूज : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील माजी खासदार व भाजपा नेते डाॅ निलेश राणे यांनी दखल घेऊन संबंधित अधिकार्यांना दिलेल्या सूचनांचा तत्काळ परिणाम मालवण तालुक्यातल्या आचरा इथे घडून आला. आचरा गाऊडवाडी, काझ़ीवाडा, भंडारवाडी आणि डोंगरेवाडी येथे खाजन स्वरुपातील क्षेत्राच्या खार बंधार्याची झडपे ( झाकणे) तुटून खाडीचे पाणी भातशेती जमीन क्षेत्रात घुसल्याने अंदाजे शेकडो एकरची जमीन बाधीत झाली होती. याबाबतची माहिती मिळताच भाजपा नेते व माजी खासदार डाॅ निलेश राणेंनी तिथे प्रत्यक्षात भेट देत ती नादुरुस्त झडपे तत्काळ दुरुस्त करायच्या सूचना संबंधित खारभूमी विकास विभागाच्या सहाय्यक अभियंत्यांना दिल्या होत्या. खारभूमी विकास विभागाचे सहाय्यक अभियंता स्वप्नील होडावडेकर यांना नादुरुस्त झडपे तात्काळ दुरुस्त करण्याबाबत तसेच योग्य ती कार्यवाही करण्याबाबत सूचना मिळाल्यानंतर दोनच दिवसांत एक मोठा ‘भात शेतीजमीन बाधीत होण्याचे संकट ‘ दूर झाल्याने समाधान व्यक्त होत आहे.

भाजपा तालुका अध्यक्ष धोंडी चिंदरकर, खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष राजन गांवकर, माजी जि.प.सदस्य जेराॅन फर्नांडिस, भाजपा शक्तीकेंद्र प्रमुख जगदीश पांगे व इतरांनी याबाबत संबंधित विभागाची प्रशंसा केली असून माजी खासदार डाॅ निलेश राणे यांनी देखील दूरध्वनी द्वारे संबंधित यंत्रणेचे आभार मानले असल्याचे सूत्रांकडून समजते आहे.

फोटो सौजन्य | आचरा ब्युरो

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

आचरा | ब्युरो न्यूज : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील माजी खासदार व भाजपा नेते डाॅ निलेश राणे यांनी दखल घेऊन संबंधित अधिकार्यांना दिलेल्या सूचनांचा तत्काळ परिणाम मालवण तालुक्यातल्या आचरा इथे घडून आला. आचरा गाऊडवाडी, काझ़ीवाडा, भंडारवाडी आणि डोंगरेवाडी येथे खाजन स्वरुपातील क्षेत्राच्या खार बंधार्याची झडपे ( झाकणे) तुटून खाडीचे पाणी भातशेती जमीन क्षेत्रात घुसल्याने अंदाजे शेकडो एकरची जमीन बाधीत झाली होती. याबाबतची माहिती मिळताच भाजपा नेते व माजी खासदार डाॅ निलेश राणेंनी तिथे प्रत्यक्षात भेट देत ती नादुरुस्त झडपे तत्काळ दुरुस्त करायच्या सूचना संबंधित खारभूमी विकास विभागाच्या सहाय्यक अभियंत्यांना दिल्या होत्या. खारभूमी विकास विभागाचे सहाय्यक अभियंता स्वप्नील होडावडेकर यांना नादुरुस्त झडपे तात्काळ दुरुस्त करण्याबाबत तसेच योग्य ती कार्यवाही करण्याबाबत सूचना मिळाल्यानंतर दोनच दिवसांत एक मोठा 'भात शेतीजमीन बाधीत होण्याचे संकट ' दूर झाल्याने समाधान व्यक्त होत आहे.

भाजपा तालुका अध्यक्ष धोंडी चिंदरकर, खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष राजन गांवकर, माजी जि.प.सदस्य जेराॅन फर्नांडिस, भाजपा शक्तीकेंद्र प्रमुख जगदीश पांगे व इतरांनी याबाबत संबंधित विभागाची प्रशंसा केली असून माजी खासदार डाॅ निलेश राणे यांनी देखील दूरध्वनी द्वारे संबंधित यंत्रणेचे आभार मानले असल्याचे सूत्रांकडून समजते आहे.

फोटो सौजन्य | आचरा ब्युरो

error: Content is protected !!