तांबळघाटी धनगरवाडी ग्रामस्थ व समाज सेवक आर.बी. यांचे महावितरणला लेखी खडे बोल…! ( लक्षवेधी )
सुयोग पंडित | मुख्य संपादक : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी तालुक्यातल्या तांबळघाटी धनगरवाडी, सडूरे येथे असणारी महावितरणची विद्यूत योजना लोखंडी पोल(खांब) अत्यंत जास्त प्रमाणात गंजले आहेत व मोडकळीस आलेले आहेत.
कधीही जमीनदोस्त(पडू) होऊ शकतात असे लेखी निवेदन ग्रामस्थ व मुंबई स्थित समाजसेवक आर.बी. बोडेकर यांनी महावितरणला दिले आहे.
या धोकादायक व जीव घेण्या विद्युत खांबामुळे कोणाचाही प्राण जाण्याची शक्यता नाकारता येत नाही असे नमूद करुन त्यांनी येत्या पावसाळ्यात विद्युत खांब नादुरुस्त झाल्यास विद्युत पुरवठा खंडित होऊ शकतो व नागरिकांची गैरसोय होऊ शकते असेही सांगितले आहे. या विषयी संबंधित अधिकारी यांनी तात्काळ लक्ष देऊ क्षेत्र तथा स्थळ पाहणी करून उपाययोजना करावी असे त्यांनी सुचवले असून वरीष्ठ अधिकार्यांनी जातीने लक्ष देऊन उपाययोजना करावी असे निवेदन दिले आहे.