संतोष साळसकर | सहसंपादक : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तळेरे वाघाचीवाडी येथील श्री शेवरादेवी देवस्थानचे विविध धार्मिक कार्यक्रम उद्या १५ एप्रिलला आयोजित केले आहेत. या सर्व कार्यक्रमांना उपस्थित राहण्याचे आवाहन तळेरे वाघाचीवाडी ग्रामस्थ व मुंबई यांच्याकडून करण्यात आले आहे.
दरवर्षी १५ एप्रिलला तळेरे वाघाचीवाडी येथील श्री शेवरादेवीचा वार्षिक उत्सव साजरा केला जातो. गेल्यावर्षीच या देवीचा मोठा उत्सव साजरा करण्यात आला. त्यासाठी तळेरे वाघाचीवाडी आणि मुंबई ग्रामस्थ यांनी विशेष मेहनत घेतली. यावर्षीही उद्या शनिवारी, १५एप्रिलला सकाळी १० वा. अभिषेक आणि ब्राम्हणपूजा, समरतान हे धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. त्यानंतर दुपारी १ ते ३ पर्यंत महाप्रसाद होईल. या सर्व कार्यक्रमांना उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.