मसुरे | प्राजक्ता पेडणेकर : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या मसुरे कावावाडी येथील श्री देव हनुमान मंदिराचा १३ वा वर्धापन दिन सोहळा तसेच श्री देव हनुमान जन्मोत्सव सोहळ्या निमित्त २ एप्रिल ते ६ एप्रिल या कालावधीत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
२ एप्रिल ते ४ एप्रिल दरम्यान गजानन कावा क्रिकेट संघ आणि मसुरे भंडारी समाज सेवा संघ आयोजित भव्य ओव्हर आर्म क्रिकेट स्पर्धा आजपासून सुरु झाली असून , ४ एप्रिलला
सकाळी १०.०० ते २.०० नेत्र चिकित्सा शिबीर व
संजीवनी थेट रक्तदाता ग्रुप नोंदणी प्रारंभ सोहळा. ५ एप्रिलला सकाळी ८.०० ते १०.०० अभिषेक व लघुरुद्र, सकाळी १०.०० ते १.०० सत्यनारायण महापूजा, आरती, प्रसाद रात्री १०.०० वा. मसुरे भंडारी समाज सेवा संघ निर्मित जय बजरंगबली नाट्यमंडळाचा नाट्यप्रयोग ‘शेवटी मीच अपराधी’, ६ एप्रिलला पहाटे ५.०० वा. श्री देव हनुमान जन्मोत्सव व किर्तन सोहळा,सकाळी ७.०० वा. श्री देव हनुमान पालखी सोहळा महाआरती,दुपारी १.०० वा. महाप्रसाद, रात्री ९.०० ते १०.०० वा. मसुरे भंडारी समाज सेवा संघ मुंबई यांच्यावतीने ग्रामीण भागातील यशस्वी विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा,रात्री १०.०० ते २.०० वा. जय बजरंगबली भजन मंडळाचा वारकरी महादिंडी नृत्यसोहळा होणार आहे. या संपूर्ण सोहळ्याला सर्वांना उपस्थितीचे आवाहन करण्यात आले आहे.