बांदा /राकेश परब: जिल्हा वार्षिक नियोजन मधुन महाविकास आघाडी सरकारच्या काळात मंजूर झालेल्या इन्सुली कोनवाडा ते गावठाण मार्गावरील पुल व रस्त्याचे भूमिपूजन ठाकरे गटाचे इन्सुली शाखा प्रमुख उल्हास गावडे यांच्या हस्ते करण्यात आले. या मार्गावरील हे महत्वाचे पुल असुन गेली कित्येक वर्षे नादुरुस्त होते. या पुलाचे काम सुरू केल्याने नागरिकांतून समाधान व्यक्त होत आहे.
यावेळी ठाकरे गटाचे जिल्हा समन्वयक बाळा गावडे, ग्रामपंचायत सदस्य सोनाली मेस्त्री, विभागप्रमुख फिलिप्स रॉडिक्स,आपा आमडोसकर,माजी सरपंच बाळू मेस्त्री, नाना पेडणेकर,माजी उपसरपंच काका चराटकर, कौस्तुभ गावडे,सचिन पालव,संदीप कोठावळे, रघुवीर देऊलकर,अनिल आईर,संतोष मेस्त्री, माजी मुख्याध्यापक विनोद गावकर, नितीन मुळीक, न्हानू कानसे, सचिन गावडे, दिनेश गावडे, आपा मेस्त्री आदी उपस्थित होते. सदरच्या पुलाचे व रस्त्याचे काम बाळा गावडे यांच्या माध्यमातून मंजूर झाले होते. गेली अनेक वर्षे हे पूल नादुरुस्त होते त्यामुळे हे काम करण्याची स्थानिक ग्रामस्थांची मागणी होती. तसेच सदरचा रस्ता सुद्धा सुरळीत व्हावा अशी मागणी होती हे काम सुरू केल्यामुळे स्थानिक ग्रामस्थांतून समाधान व्यक्त होत आहे