अखिल भारतीय आयुर्वेद संस्थान गोवा, उत्कर्ष युवक कला-क्रीडा मंडळ इन्सुली डोबाशेळ यांचेही असेल मोलाचे सहकार्य.
बांदा | राकेश परब : ‘अखिल भारतीय आयुर्वेद संस्थान गोवा, रोटरी क्लब ऑफ बांदा आणि उत्कर्ष युवक कला-क्रीडा मंडळ इन्सुली डोबाशेळ’ यांच्या संयुक्त विद्यमाने ६० वर्षांवरील सर्व नागरिकांसाठी रविवार २६ मार्चला मोफत महाआरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.
या शिबिरात इन्सुली व पंचक्रोशीतील गावातील सर्व नागरिकांसाठी मोफत वैद्यकीय तपासणी आणि आवश्यक औषध पुरवठा करण्यात येणार आहे. हे शिबीर सांस्कृतिक सभागृह इन्सुली कोनवाडा येथे सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत संपन्न होणार आहे. शिबिरात अखिल भारतीय आयुर्वेद संस्थानचे रोगनिदान विकृती विज्ञानचे डॉ. राजेश उकीये, स्वास्थवृत्त तज्ञ डॉ. योगेश शिंदे, पंचकर्मचे वैद्यकीय अधिकारी डॉ.ललिता गांवकर, डॉ. दीपश्री गवस, औषध निर्माता भक्ती चव्हाण, परिचारिका विनिता गाड, सिद्धेश आईर, सागर धुरी आदी उपस्थित राहणार आहेत.
शिबीर प्रमुख स्वागत नाटेकर यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन बांदा रोटरी क्लबचे अध्यक्ष मंदार कल्याणकर यांनी केले आहे.