कुडाळ | देवेंद्र गावडे (उपसंपादक) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त ५०० बाटल्या रक्तसंकलनाचा संकल्प पूर्णत्वाकडे जात असून मंगळवारी कुडाळ शिवसेना शाखेत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या रक्तदान शिबिराला रक्तदात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. तसेच काल पावशी येथे आमदार वैभव नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर घेण्यात आले. या शिबिरालाही रक्तदात्यांकडून उस्फूर्त प्रतिसाद मिळाला. याठिकाणी सुमारे १५० रक्तदात्यांनी रक्तदान केले.
या रक्तदान शिबिरांना सिंधुदुर्ग जिल्हा रुग्णालयाच्या व रक्त पेढी विभागाच्या कर्मचाऱ्यांचे विशेष सहकार्य मिळाले.
यावेळी कुडाळ येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे जिल्हाप्रमुख संजय पडते, उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत,युवासेना जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट,तालुकाप्रमुख राजन नाईक,संघटक बबन बोभाटे, उपतालुकाप्रमुख कृष्णा धुरी, ओबीसी सेल जिल्हाप्रमुख रुपेश पावसकर,शहरप्रमुख संतोष शिरसाट, अतुल बंगे, स्वप्निल शिंदे, बाबी गुरव,बंड्या कोरगावकर, श्रेया गवंडे,ज्योती जळवी,संदीप म्हाडेश्वर, मंगेश बांदेकर, बाळ धुरी, मितेश वालावलकर, गुरुनाथ गडकर, धिरेंद्र उर्फ गोट्या चव्हाण, अनघा तेंडुलकर,मिहिर तेंडोलकर आदी उपस्थित होते.
पावशी येथे जिल्हाप्रमुख संजय पडते, उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत, तालुकाप्रमुख राजन नाईक, संघटक बबन बोभाटे, उपतालुकाप्रमुख कृष्णा धुरी,उपतालुकाप्रमुख बाळा कोरगावकर, दिनेश वारंग राजू गवंडे,रुपेश पावसकर, दीपक आंगणे, सरपंच वैशाली पावसकर, उपसरपंच लक्ष्मीकांत तेली, वसंत भोगटे, गणेश पावस्कर दिव्या खोत, निकिता शेळके, दिव्या दळवी, बाबु वायंगणकर, तुषार शेलटे, मनिष तोटकेकर,कन्हैया वायंगणकर व ग्रामस्थ उपस्थित होते.