विवेक परब/ ब्यूरो चिफ :मालवण तालुक्यातील श्री स्वामी समर्थ मठ समर्थगड-आडवली येथे२३ मार्च २०२३ रोजी श्री स्वामी जयंती उत्सव विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांनी साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त २३ मार्च ते ३० मार्च या कालावधीत विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.२३ मार्च रोजी सकाळी ६ ते ९ विधीवत पूजा,सकाळी ९.०० वा. नंतर भाविक भक्तांना दर्शन, दुपारी १२.३० वा. महाआरती, दुपारी १ वा. महाप्रसाद,रात्री ८.०० ते ८.३०. महाआरती, ९.०० ते १२.०० महाप्रसाद ९.०० वा. पासून सुस्वर स्थानिक भजने. २४ मार्च रोजीरात्री ९.०० वा. जिल्हास्तरीय एकेरी नृत्य स्पर्धा.प्रथम पारितोषिक रु. ७०००/- सन्मानचिन्ह,द्वितीय पारितोषिक रु.५०००/- सन्मानचिन्ह,तृतीय पारितोषिक रु.३०००/- सन्मानचिन्ह, उत्तेजनार्थ बक्षीस.रात्री ९.०० वा. अल्पोपहार खिचडी, शिरा, चहा. २५ मार्च रोजीरात्री ९.०० वा. उदय साटम निर्मित मराठी वाद्यवृंद “मराठी पाऊल पडते पुढे” भन्नाट डान्स आणि कॉमेडी, रात्री ९.०० वा. अल्पोपहार खिचडी, शिरा, चहा. २६ मार्च रोजी रात्रौ दर्शन साटम निर्मित हिंदी वाधवृंद ” मेरी आवाज ही मेरी पहचान” म्युझिक,मस्ती भन्नाट डान्स कॉमेडी. २७ मार्च रोजी रात्री ९.०० वा. जिल्हास्तरीय समुहनृत्य स्पर्धा. प्रथम पारितोषिकरु.१५०००/- सन्मानचिन्ह, द्वितीय पारितोषिक रु.१२०००/- सन्मानचिन्ह, तृतीय पारितोषिक रु.९०००/- सन्मानचिन्ह,उत्तेजनार्थ बक्षीस. रात्री ९००या अल्पोपहार खिचडी, शिरा, चहा. २८ मार्च रोजी रात्री ९.०० वा. विवेकानंद मेस्त्री निर्मित विविध पौराणिक प्रसंगानुसार “चमत्कार ट्रिकसन” सहित गोफ नृत्य, ९.०० वा. अल्पोपहार खिचडी, शिरा, चहा. २९ मार्च रोजी रात्री ९.०० वा. पंचक्रोशीतील मुलांचे समूह नृत्य व एकेरी नृत्य९.०० वा. अल्पोपहार खिचडी, शिरा, चहा.३० मार्च रोजी सांगता सोहळा ८.०० ते ८.३०वा. महाआरती,१.०० वा. महाप्रसाद, रात्री ९.०० वा. दशावतार “ट्रिकसन” सहित. अधिक महिती साठी सिताराम नागेश सकपाळ (९४२०२१०२६२)यावेळी भव्य दिव्य जत्रोत्सव आकाश पाळणी, खेळणी, कपडयांची दुकाने इत्यादी असणार आहेत. उपस्थीतीचे आवाहन करण्यात आले आहे.
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -