विवेक परब | ब्यूरो चीफ : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या त्रिंबक येथील श्री ठाणेश्वर महिला ग्रामसंघाचा महिला दिन नुकताच उत्साहात साजरा झाला. या कार्यक्रमाचे दीप प्रज्वलन ग्रामपंचायत सदस्य सौ. नेहा वेंगुर्लेकर, संतोषी सावंत, सपना तेली, सुचिता घाडीगांवकर यांच्या हस्ते करण्यात आले आणि सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला प्रमुख पाहुण्या सौ. दुर्वा पडवळ-आचरा प्रभाग सिटिसी यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.
समूह गीत, संगीत खुर्ची, गाणी असे विविध सांस्कृतिक कार्यक्रम यावेळी घेण्यात आले व महिला हळदी कुंकू कार्यक्रमही संपन्न झाला. आचरा विभाग सीटीसी सौ. दुर्वा पडवळ यांनी महिलांना विशेष मार्गदर्शन केले. यावेळी ग्रामसंघ अध्यक्ष रेशमा मेस्री, सिमा घाडीगांवकर-कोषाध्यक्ष, प्रज्ञा माळकर-सचिव, ग्रामपंचायत सदस्य सौ. नेहा वेंगुर्लेकर, कविता त्रिंबककर, मिनाक्षी त्रिंबककर, ग्रामसंघ लिपीक पूजा सुतार, ग्रामसंघाच्या सर्व समूह सदस्या, आशा सेविका, आरोग्य सेविका तसेच अनेक महिला उपस्थित होत्या.