26.8 C
Mālvan
Thursday, September 19, 2024
Download Aarti Sangrah
ASN Ganapati AD
IMG-20240531-WA0007

शिडवणे नं.१ शाळेत जागतिक महिला दिन साजरा

- Advertisement -
- Advertisement -

ब्यूरो चिफ-विवेक परब :दरवर्षी ८ मार्च रोजी जगभर जागतिक महिला दिन साजरा केला जातो. शिडवणे नं. १ शाळेत ‘जागतिक महिला दिन’ अतिशय नाविन्यपूर्ण पद्धतीने साजरा करण्यात आला. यावेळी उपस्थित शाळेतील उपशिक्षिका सुजाता कुडतरकर, सीमा वरुणकर, शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्षा समिता सुतार, अंगणवाडी सेविका पाटणकरबाई, मदतनीस केतकरबाई यांचा गुलाबपुष्प देऊन सन्मान करण्यात आला.

धनश्री सुतार हिने ‘घे भरारी नारीशक्ती’ या गीतावर नृत्य सादर केले. शफा शेख, जोया शेख, फरीन शेख, अनुष्का जाधव, तनिष्का पाटणकर, श्रावणी भोवड या मुलींनी एक समूहनृत्य सादर करुन कार्यक्रमाची रंगत वाढवली.

उपाध्यक्षा समिता सुतार यांनी महिलांच्या सबलीकरणावर आधारित एका कवितेचे सुमधुर गायन केले. अंगणवाडी सेविका पाटणकर यांनी शुभेच्छा दिल्या. उपशिक्षिका सुजाता कुडतरकर आणि सीमा वरुणकर या दोन्ही शिक्षकांनी प्रबोधनपर मार्गदर्शन केले. पदवीधर शिक्षक प्रवीण कुबल आणि मुख्याध्यापक सुनिल तांबे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. शाळेतील सर्व मुलामुलींनी या कार्यक्रमाचा लाभ घेतला.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

ब्यूरो चिफ-विवेक परब :दरवर्षी ८ मार्च रोजी जगभर जागतिक महिला दिन साजरा केला जातो. शिडवणे नं. १ शाळेत 'जागतिक महिला दिन' अतिशय नाविन्यपूर्ण पद्धतीने साजरा करण्यात आला. यावेळी उपस्थित शाळेतील उपशिक्षिका सुजाता कुडतरकर, सीमा वरुणकर, शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्षा समिता सुतार, अंगणवाडी सेविका पाटणकरबाई, मदतनीस केतकरबाई यांचा गुलाबपुष्प देऊन सन्मान करण्यात आला.

धनश्री सुतार हिने 'घे भरारी नारीशक्ती' या गीतावर नृत्य सादर केले. शफा शेख, जोया शेख, फरीन शेख, अनुष्का जाधव, तनिष्का पाटणकर, श्रावणी भोवड या मुलींनी एक समूहनृत्य सादर करुन कार्यक्रमाची रंगत वाढवली.

उपाध्यक्षा समिता सुतार यांनी महिलांच्या सबलीकरणावर आधारित एका कवितेचे सुमधुर गायन केले. अंगणवाडी सेविका पाटणकर यांनी शुभेच्छा दिल्या. उपशिक्षिका सुजाता कुडतरकर आणि सीमा वरुणकर या दोन्ही शिक्षकांनी प्रबोधनपर मार्गदर्शन केले. पदवीधर शिक्षक प्रवीण कुबल आणि मुख्याध्यापक सुनिल तांबे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. शाळेतील सर्व मुलामुलींनी या कार्यक्रमाचा लाभ घेतला.

error: Content is protected !!