26.8 C
Mālvan
Thursday, September 19, 2024
Download Aarti Sangrah
ASN Ganapati AD
IMG-20240531-WA0007

भा.ज.पा.किसान मोर्चा , सिंधुदुर्ग च्या वतीने किसान सन्मान निधी योजनेला चार वर्षे पुर्ण होत असल्याने ” धन्यवाद मोदीजी ” अभियानाचे आयोजन

- Advertisement -
- Advertisement -

सहसंपादक /नवलराज काळे- देशाचे यशस्वी पंतप्रधान मान. नरेंद्रभाई मोदी यांनी शेतकऱ्यांसाठी सुरु केलेल्या ” किसान सन्मान निधी ” योजनेला २४ / २ / २०२३ रोजी चार वर्षे पुर्ण होत आहेत , त्यानिमित्ताने भाजपा किसान मोर्चा , सिंधुदुर्ग च्या वतीने जिल्ह्यांमधील या योजनेच्या लाभार्त्यांशी संवाद साधून त्या शेतकऱ्यांकडून मोदीजींचे आभार पत्र घेऊन ते पंतप्रधानांना पाठविण्याचा कार्यक्रम घेणार असल्याचे किसान मोर्चाचे जिल्हा संयोजक उमेश सावंत यांनी सांगितले . भाजपा किसान मोर्चा , सिंधुदुर्ग ची बैठक कुडाळ एम् .आय .डी.सी . विश्रामगृहावर जिल्हा संयोजक उमेश सावंत व भाजपा जिल्हा सरचिटणीस तथा किसान मोर्चा प्रभारी प्रसंन्ना देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली . या बैठकीसाठी श्री.किशोर नरे -जिल्हा उपाध्यक्ष , श्री.गुरुनाथ पाटील – जिल्हा सरचिटणीस ,श्री.अजय सावंत – जिल्हा चिटणीस , *मंडल अध्यक्ष* श्री.महेश संसारे – वैभववाडी ,श्री.यशवंत पंडित – वेंगुर्ला , श्री.सूर्यकांत नाईक – कुडाळ , श्री.महेश सारंग – मालवण, श्री.सत्यवान पालव , श्री.प्रकाश राणे , श्री.महादेव सावंत , श्री.हरी केळूसकर , श्री.ज्ञानेश्वर केळजी – अध्यक्ष वेंगुर्ला तालुका ख.वि. संघ व इतर जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

या बैठकीमध्ये मा.मुख्यमंत्री श्री.एकनाथ शिंदे व मा.उपमुख्यमंत्री श्री.देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने गेल्या सात महिन्यांच्या कामामुळे महाविकास आघाडी सरकारच्या काळात हताश झालेल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पुन्हा दिलासा मिळाला, त्याबद्दल जिल्हा कार्यकारणीत अभिनंदनाचा ठराव घेण्यात आला. तसेच मोदी सरकारने यंदाच्या अर्थसंकल्पात कृषी क्षेत्राला आधुनिक करण्यासाठी महत्वाच्या तरतुदी केल्याबद्दल केंद्र सरकारचे ही आभार मानण्यात आले. महाराष्ट्र शासनाची ‘ *रत्नसिन्धु* ‘ योजना जिल्ह्यातील शेतकरी वर्गापर्यंत पोहचविण्याचे अभियान किसान मोर्चा तर्फे घेण्याबाबत ठरविण्यात आले. तसेच वन्य् प्राण्यांपासून होणारे शेतीच्या नुकसानी संदर्भात मा.जिल्हाधिकारी यांना भेटण्याचे नियोजन करण्यात आले . दिनांक २६ फेब्रुवारी रोजी पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांचा ” *मन कि बात* ” कार्यक्रम किसान सन्मान योजनेच्या लाभार्थ्यां सोबत पहाण्याचे नियोजन करण्यात आले . जिल्ह्यामध्ये शेतकरी वर्गाला किसान मोर्चाच्या वतीने प्रशिक्षण देण्यासाठी एक समिती स्थापन करण्यात आली असुन या समिती मध्ये श्री.बापू पंडित,श्री.महेश संसारे,श्री.हरी केळूसकर,सौ दीपा काळे यांची नियुक्ती करण्यात आली.

यानंतर जिल्हा सरचिटणीस श्री.गुरुनाथ पाटील यांनी उपस्थित यांचे आभार माणून बैठक संपल्याचे जाहीर केले.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

सहसंपादक /नवलराज काळे- देशाचे यशस्वी पंतप्रधान मान. नरेंद्रभाई मोदी यांनी शेतकऱ्यांसाठी सुरु केलेल्या " किसान सन्मान निधी " योजनेला २४ / २ / २०२३ रोजी चार वर्षे पुर्ण होत आहेत , त्यानिमित्ताने भाजपा किसान मोर्चा , सिंधुदुर्ग च्या वतीने जिल्ह्यांमधील या योजनेच्या लाभार्त्यांशी संवाद साधून त्या शेतकऱ्यांकडून मोदीजींचे आभार पत्र घेऊन ते पंतप्रधानांना पाठविण्याचा कार्यक्रम घेणार असल्याचे किसान मोर्चाचे जिल्हा संयोजक उमेश सावंत यांनी सांगितले . भाजपा किसान मोर्चा , सिंधुदुर्ग ची बैठक कुडाळ एम् .आय .डी.सी . विश्रामगृहावर जिल्हा संयोजक उमेश सावंत व भाजपा जिल्हा सरचिटणीस तथा किसान मोर्चा प्रभारी प्रसंन्ना देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली . या बैठकीसाठी श्री.किशोर नरे -जिल्हा उपाध्यक्ष , श्री.गुरुनाथ पाटील - जिल्हा सरचिटणीस ,श्री.अजय सावंत - जिल्हा चिटणीस , *मंडल अध्यक्ष* श्री.महेश संसारे - वैभववाडी ,श्री.यशवंत पंडित - वेंगुर्ला , श्री.सूर्यकांत नाईक - कुडाळ , श्री.महेश सारंग - मालवण, श्री.सत्यवान पालव , श्री.प्रकाश राणे , श्री.महादेव सावंत , श्री.हरी केळूसकर , श्री.ज्ञानेश्वर केळजी - अध्यक्ष वेंगुर्ला तालुका ख.वि. संघ व इतर जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

या बैठकीमध्ये मा.मुख्यमंत्री श्री.एकनाथ शिंदे व मा.उपमुख्यमंत्री श्री.देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने गेल्या सात महिन्यांच्या कामामुळे महाविकास आघाडी सरकारच्या काळात हताश झालेल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पुन्हा दिलासा मिळाला, त्याबद्दल जिल्हा कार्यकारणीत अभिनंदनाचा ठराव घेण्यात आला. तसेच मोदी सरकारने यंदाच्या अर्थसंकल्पात कृषी क्षेत्राला आधुनिक करण्यासाठी महत्वाच्या तरतुदी केल्याबद्दल केंद्र सरकारचे ही आभार मानण्यात आले. महाराष्ट्र शासनाची ' *रत्नसिन्धु* ' योजना जिल्ह्यातील शेतकरी वर्गापर्यंत पोहचविण्याचे अभियान किसान मोर्चा तर्फे घेण्याबाबत ठरविण्यात आले. तसेच वन्य् प्राण्यांपासून होणारे शेतीच्या नुकसानी संदर्भात मा.जिल्हाधिकारी यांना भेटण्याचे नियोजन करण्यात आले . दिनांक २६ फेब्रुवारी रोजी पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांचा " *मन कि बात* " कार्यक्रम किसान सन्मान योजनेच्या लाभार्थ्यां सोबत पहाण्याचे नियोजन करण्यात आले . जिल्ह्यामध्ये शेतकरी वर्गाला किसान मोर्चाच्या वतीने प्रशिक्षण देण्यासाठी एक समिती स्थापन करण्यात आली असुन या समिती मध्ये श्री.बापू पंडित,श्री.महेश संसारे,श्री.हरी केळूसकर,सौ दीपा काळे यांची नियुक्ती करण्यात आली.

यानंतर जिल्हा सरचिटणीस श्री.गुरुनाथ पाटील यांनी उपस्थित यांचे आभार माणून बैठक संपल्याचे जाहीर केले.

error: Content is protected !!