24.9 C
Mālvan
Thursday, September 19, 2024
Download Aarti Sangrah
ASN Ganapati AD
IMG-20240531-WA0007

उदय रोगे रडले…आम्ही नाही पाहिले..!

- Advertisement -
- Advertisement -

सुयोग पंडित | संपादकीय : काही महिन्यांपूर्वी आपली सिंधुनगरी चॅनेलने ‘ चिमणीचे घर आणि बी जागर ‘ हा एक विशेष वृत्तांत केला होता. दीपक ठाणेकर नावाचा एक चुकून ठरलेला ‘पक्षी हत्यारा’ आणि नंतर पक्षी प्रेमी न रहाता स्वतः ‘पक्षी जाणिव’ बनलेल्या त्या दीपक ठाणेकर नावाच्या व्यक्तीवर आपल्या आपली सिंधुनगरी चॅनल समूहाचे दिवंगत मार्गदर्शक श्रीनिवास पंडित व आपली सिंधुनगरी चॅनेलच्या उपसंपादक वैशाली पंडित यांच्या वास्तव अनुभवातला तो प्रकल्प…!

जवळपास ७ ते ८ महिने उलटून गेले आणि आम्ही सर्व आपली सिंधुनगरी समूह त्यावर विचारही फारसा नसेल केला..किंवा केला तरी आमच्यापैकी कोणीच ‘दीपक ठाणेकर’ बनलो नाहीत हे सत्य कारण आम्ही मिडिया आहोत व वर्तमानात जगतो…व वर्तमानालाच मानतो…आमच्या मर्यादा आहेत.

या सर्व मर्यादा व त्यांचा बंध काल तुटला जेंव्हा एक लेख वणव्यासारखा पेटला ,’आग आमच्या घराला लागली…!’ मालवण जवळील माळरानावर आग लागून हानी झाली आणि काही ‘अस्तित्वाची घरटी’ जळली तेंव्हा…..

एरवी छत्रपतींची निष्ठा बाळगणारे एक सच्चे मराठी…उत्कृष्ट निरुपणकार उदय रोगे यांनी उघड आवाहनातून हुंदका दिला तेंव्हा मात्र…..जाग आली.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील एक चित्त थरारक घटना असे नाईलाजाने त्यांना सामाजिक मंचावर वर्णन करावे लागले कारण आजकाल ‘चित्त थरार ‘ नसेल तर उद्देशाचे गांभीर्य कळतच नाही.


१३ फेब्रुवारीला दुपारनंतरच्या सत्रात सुमारे दहा एकर एवढ्या एरिया सुकलेले गवत म्हणजे त्याला आपण करड म्हणतो हे करड पूर्ण मोठ्या प्रमाणात सुमारे दहा एकरच्या जागेत जळालेले होते काही ठिकाणी त्यावेळेला अग्निशामकाने सुद्धा विजविण्याचा प्रयत्न केला गेला तर काही स्थानिकांनीही प्रयत्न केला..सायंकाळी पाचच्या सुमारास तिथून उदयजी रीगे पुढे गेले जातेवेळी अग्निशामक रोडवरती उभा होता हे त्यांनी दृश्य पाहिलेले होते व तिथून पुढे.. त्या सुमारे दहा एकरच्या एरियातून अनेक आवाज येत होते या आवाजांचा सूर फार भयानक होता काळजात थरकाप उडवणारे हे आवाज मनाला भिडू लागले आणि आमच्या गाडीचे ब्रेक लागले आम्ही रस्त्याच्या कडेला गाडी लावून उदय रोगे व माझा त्यांचे स्नेही हे दोघेही वणवा पेटून गेलेल्या राखेवरून चालू लागले… अनेक प्रकारचे हजारो पक्षी आपल्या झाडावरती बसून आक्रोश करत होते एखाद्या संकटाच्या वेळी सगळे पक्षी एका भल्या मोठ्या झाडाकडे एकत्र व्हायचे परंतु आता दृश्य वेगळे होते आता छोट्या छोट्या झाडांवर एक दोन एक दोन पक्षीच होते आणि अशा अनेक झाडाझुडपात हजारो पक्षी आक्रोश करत होते त्यांची घरटी त्यांची पिल्ले त्यांची अंडी या आगीत भस्मसात झाली होती व कोणी कोणाकडे जायचे कोणी कोणाची मदत घ्यायची व आपल्या पिल्लांना आपण कसे वाचवू शकू याच उद्देशाने त्यांचा मनाचा थरकाप उडवणारा आक्रोश सुरू होता हजारो पक्षांची पिल्ले अंडी या एकाच वेळी आगीच्या ज्वालांनी भस्म झाली होती अवशेषही शिल्लक राहिलेले नव्हते पक्षी आकाशात उडून जळताना पाहिलेल्या पिल्लांना आक्रोश करत होते परंतु ती आग शांत झाल्यावर त्या ठिकाणी ते पुन्हा पुन्हा उतरून पिल्लांची झालेली राग तोच मारून शोधत होते कोण मदत करणार व कशी करावी हा प्रश्न होताच कारण अनेक कुटुंबांचे या वणव्याने जीव घेतलेले होते पक्षांचा आक्रोश हा भयंकर होता आणि दुसरीकडे सूर्यास्त होत होता अशा वेळेला आज त्यांना स्वतःचे घर नव्हते कुठे राहायचे रात्र कशी काढायची असे अनेक प्रश्न त्यांच्याकडे उभे होते खरंतर या ठिकाणी जवळपास पाणी नाहीच परंतु थोड्या अंतरावरून त्यांना पाणी मिळण्यासारखे होते पण त्याचा उपयोग काहीच नव्हता कारण त्यांचा पूर्ण कुटुंबच आज त्यांच्यापासून वेगळं झालेलं होते “कोणी आहे का आम्हाला वाचवा
अशा या हजारो पक्षांचे संसार उध्वस्त झालेत त्यांना कोण व कशी भरपाई देणार त्यांची घरे ही कुठच्या सातबारावर नाहीत नकाशावर नाहीत किंवा त्याची नोंद ही कुठच्याही शासन दरबारी त्यांची नोंदच नाही..!”

१३ फेब्रुवारी हा दिवस म्हणजे कोकणातील पक्ष्यांसाठी ‘ काळा दिवस’ ..असे उदय रोगे मानतात…आपण मानतो का..?का आपले हेच म्हणणे,” उदय रोगे व दीपक ठाणेकर रडले..आम्ही नाही पाहिले…!”

जीवनाचे कृष्णसार तथा विष्णू मंत्र स्तोत्र आपल्याला खरेच कळले का हा आत्मपरीक्षण विषय..”

आकाशात्पतितं तोयं यथा गच्छति सागरम्।

.

आकाशात्पतितं तोयं यथा गच्छति सागरम्।

सर्वदेवनमस्कार: केशवं प्रति गच्छति.!

त्यातील ‘तोयं’… शब्दाचा महत्वाचा कळला तर उदय रोगे कळतील व दीपक ठाणेकरही.!

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

सुयोग पंडित | संपादकीय : काही महिन्यांपूर्वी आपली सिंधुनगरी चॅनेलने ' चिमणीचे घर आणि बी जागर ' हा एक विशेष वृत्तांत केला होता. दीपक ठाणेकर नावाचा एक चुकून ठरलेला 'पक्षी हत्यारा' आणि नंतर पक्षी प्रेमी न रहाता स्वतः 'पक्षी जाणिव' बनलेल्या त्या दीपक ठाणेकर नावाच्या व्यक्तीवर आपल्या आपली सिंधुनगरी चॅनल समूहाचे दिवंगत मार्गदर्शक श्रीनिवास पंडित व आपली सिंधुनगरी चॅनेलच्या उपसंपादक वैशाली पंडित यांच्या वास्तव अनुभवातला तो प्रकल्प…!

जवळपास ७ ते ८ महिने उलटून गेले आणि आम्ही सर्व आपली सिंधुनगरी समूह त्यावर विचारही फारसा नसेल केला..किंवा केला तरी आमच्यापैकी कोणीच 'दीपक ठाणेकर' बनलो नाहीत हे सत्य कारण आम्ही मिडिया आहोत व वर्तमानात जगतो…व वर्तमानालाच मानतो…आमच्या मर्यादा आहेत.

या सर्व मर्यादा व त्यांचा बंध काल तुटला जेंव्हा एक लेख वणव्यासारखा पेटला ,'आग आमच्या घराला लागली…!' मालवण जवळील माळरानावर आग लागून हानी झाली आणि काही 'अस्तित्वाची घरटी' जळली तेंव्हा…..

एरवी छत्रपतींची निष्ठा बाळगणारे एक सच्चे मराठी…उत्कृष्ट निरुपणकार उदय रोगे यांनी उघड आवाहनातून हुंदका दिला तेंव्हा मात्र…..जाग आली.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील एक चित्त थरारक घटना असे नाईलाजाने त्यांना सामाजिक मंचावर वर्णन करावे लागले कारण आजकाल 'चित्त थरार ' नसेल तर उद्देशाचे गांभीर्य कळतच नाही.


१३ फेब्रुवारीला दुपारनंतरच्या सत्रात सुमारे दहा एकर एवढ्या एरिया सुकलेले गवत म्हणजे त्याला आपण करड म्हणतो हे करड पूर्ण मोठ्या प्रमाणात सुमारे दहा एकरच्या जागेत जळालेले होते काही ठिकाणी त्यावेळेला अग्निशामकाने सुद्धा विजविण्याचा प्रयत्न केला गेला तर काही स्थानिकांनीही प्रयत्न केला..सायंकाळी पाचच्या सुमारास तिथून उदयजी रीगे पुढे गेले जातेवेळी अग्निशामक रोडवरती उभा होता हे त्यांनी दृश्य पाहिलेले होते व तिथून पुढे.. त्या सुमारे दहा एकरच्या एरियातून अनेक आवाज येत होते या आवाजांचा सूर फार भयानक होता काळजात थरकाप उडवणारे हे आवाज मनाला भिडू लागले आणि आमच्या गाडीचे ब्रेक लागले आम्ही रस्त्याच्या कडेला गाडी लावून उदय रोगे व माझा त्यांचे स्नेही हे दोघेही वणवा पेटून गेलेल्या राखेवरून चालू लागले… अनेक प्रकारचे हजारो पक्षी आपल्या झाडावरती बसून आक्रोश करत होते एखाद्या संकटाच्या वेळी सगळे पक्षी एका भल्या मोठ्या झाडाकडे एकत्र व्हायचे परंतु आता दृश्य वेगळे होते आता छोट्या छोट्या झाडांवर एक दोन एक दोन पक्षीच होते आणि अशा अनेक झाडाझुडपात हजारो पक्षी आक्रोश करत होते त्यांची घरटी त्यांची पिल्ले त्यांची अंडी या आगीत भस्मसात झाली होती व कोणी कोणाकडे जायचे कोणी कोणाची मदत घ्यायची व आपल्या पिल्लांना आपण कसे वाचवू शकू याच उद्देशाने त्यांचा मनाचा थरकाप उडवणारा आक्रोश सुरू होता हजारो पक्षांची पिल्ले अंडी या एकाच वेळी आगीच्या ज्वालांनी भस्म झाली होती अवशेषही शिल्लक राहिलेले नव्हते पक्षी आकाशात उडून जळताना पाहिलेल्या पिल्लांना आक्रोश करत होते परंतु ती आग शांत झाल्यावर त्या ठिकाणी ते पुन्हा पुन्हा उतरून पिल्लांची झालेली राग तोच मारून शोधत होते कोण मदत करणार व कशी करावी हा प्रश्न होताच कारण अनेक कुटुंबांचे या वणव्याने जीव घेतलेले होते पक्षांचा आक्रोश हा भयंकर होता आणि दुसरीकडे सूर्यास्त होत होता अशा वेळेला आज त्यांना स्वतःचे घर नव्हते कुठे राहायचे रात्र कशी काढायची असे अनेक प्रश्न त्यांच्याकडे उभे होते खरंतर या ठिकाणी जवळपास पाणी नाहीच परंतु थोड्या अंतरावरून त्यांना पाणी मिळण्यासारखे होते पण त्याचा उपयोग काहीच नव्हता कारण त्यांचा पूर्ण कुटुंबच आज त्यांच्यापासून वेगळं झालेलं होते "कोणी आहे का आम्हाला वाचवा
अशा या हजारो पक्षांचे संसार उध्वस्त झालेत त्यांना कोण व कशी भरपाई देणार त्यांची घरे ही कुठच्या सातबारावर नाहीत नकाशावर नाहीत किंवा त्याची नोंद ही कुठच्याही शासन दरबारी त्यांची नोंदच नाही..!"

१३ फेब्रुवारी हा दिवस म्हणजे कोकणातील पक्ष्यांसाठी ' काळा दिवस' ..असे उदय रोगे मानतात…आपण मानतो का..?का आपले हेच म्हणणे," उदय रोगे व दीपक ठाणेकर रडले..आम्ही नाही पाहिले…!"

जीवनाचे कृष्णसार तथा विष्णू मंत्र स्तोत्र आपल्याला खरेच कळले का हा आत्मपरीक्षण विषय.."

आकाशात्पतितं तोयं यथा गच्छति सागरम्।

.

आकाशात्पतितं तोयं यथा गच्छति सागरम्।

सर्वदेवनमस्कार: केशवं प्रति गच्छति.!

त्यातील 'तोयं'... शब्दाचा महत्वाचा कळला तर उदय रोगे कळतील व दीपक ठाणेकरही.!

error: Content is protected !!