दहावी, बारावी, पदवीधर व इंजिनिअर्स अशा सुमारे ५२ विद्यार्थ्यांचा सत्कार
कणकवली | उमेश परब : ‘जनसेवा हीच खरी ईश्वर सेवा’, हे ब्रीदवाक्य घेऊन गेली अनेक वर्षे सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या कणकवली तालुक्यातील श्री राम सेवा मंडळ हळवल यांच्या माध्यमातून दहावी बारावी उत्तीर्ण तसेच पदवीधर व इंजिनिअर्स यांचा सन्मान करण्यात आला.
श्री राम सेवा मंडळ हळवल यांच्या माध्यमातून गेली अनेक वर्षे सेवाभावी उपक्रम राबविले जात आहेत. विध्यार्थी गुणगौरव सोहळा गरीब कुटुंबाना मदत लॉकडाऊन काळात हळवल गावात साहित्य वाटप अशा प्रकारचे अनेक उपक्रम या मंडळामार्फत घेतले जातात. सण २०१९/ २० या सालात उत्तीर्ण विध्यार्थाचा गुणगौरव सोहळा श्री राम मंदिर हळवल येथे संपन्न झाला. यावेळी श्री राम सेवा मंडळ मुंबईचे अध्यक्ष पंढरी राणे, स्थानिक अध्यक्ष तातू राणे, मुंबई मंडळाचे सेक्रेटरी चंद्रकांत राणे, सुरेश राणे, विठोबा राणे, प्रभाकर राणे, शशी राणे, शंकर राणे, लक्ष्मण राणे, विक्रम राणे, समर्थ राणे, विठोबा शिवराम राणे, शामसुंदर राणे, नामदेव राणे, मयुर कुबल, सुशील राणे, नितेश राणे, गिरीश राणे, बाबू पाटकर, दिनेश तावडे, भारती चव्हाण आदींसह विध्यार्थी व पालक उपस्थिती होते. यावेळी श्रीराम सेवा मंडळाच्या वतीने हळवल गावातील सुमारे ५२ विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. दहावी बारावीच्या विध्यार्थ्यांना शालेय वस्तू तर पदवीधर व इंजिनिअर्स यांना थोर विचारवंतांची प्रसिद्ध असलेली पुस्तके देण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शामसुंदर राणे यांनी केले तर आभार शंकर राणे यांनी मानले.