29.4 C
Mālvan
Friday, November 22, 2024
IMG-20240531-WA0007
IMG-20241113-WA0000

मुंबईत फेब्रुवारी महिन्यात ३ रोजगार मेळावे ; आज गोरेगांव येथे सुरु झाला आहे रोजगार मेळावा.

- Advertisement -
- Advertisement -

११ तारखेला बोरीवली तर १८ तारखेला भांडुपमध्ये रोजगार मेळावा .

मुंबई उपनगर जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचा उपक्रम .

संतोष साळसकर | सहसंपादक : मुंबई उपनगर जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र यांच्यावतीने मुंबई उपनगरांमध्ये फेब्रुवारी महिन्यात विविध ठिकाणी पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्यांचे आयोजन करण्यात आले आहे.

राज्याचे कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या हस्ते या मेळाव्यांचे उद्घाटन होणार आहे. या मेळाव्याच्या माध्यमातून नोकरी इच्छूक उमेदवारांना रोजगाराची संधी मिळणार आहे. आज शनिवारी ४ फेब्रुवारीला शहीद स्मृती क्रींडागण (व्हीनर्स जॉगर्स पार्क), पाटकर कॉलेजजवळ, उन्नत नगर, एस. व्ही. रोड, गोरेगांव (पश्चिम) येथे मेळावा सुरु झाला आहे.

या रोजगार मेळाव्याला उपस्थित राहून नोकरी इच्छूक उमेदवारांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन मंत्री श्री. लोढा यांनी केले आहे.
इयत्ता १० वी, १२ वी उत्तीर्ण, आयटीआय, पदवीधर, पदविकाधारक अशा विविध नोकरी इच्छुक उमेदवारांसाठी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये विविध नामांकित कंपन्या व नियोक्त्यांकडून रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. मेळाव्यात रिक्त पदांसाठी पात्रतेप्रमाणे उमेदवारांच्या प्रत्यक्ष मुलाखती घेण्यात येणार आहेत.

११ फेब्रुवारीला सेंट फ्रान्सिस आयटीआय माऊंट पोनसूर, एस.व्ही.रोड, हिरालाल भगवती हॉस्पिटलजवळ, बोरिवली (पश्चिम) येथे तर १८ फेब्रुवारी रोजी ऑक्सफर्ड हायस्कूल, टँक रोड, भांडूप (पश्चिम) येथे हे मेळावे होणार आहेत. या ठिकाणी सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत उपस्थित राहून याचा लाभ घ्यावा, असे आवाहन सहायक आयुक्त प्र.वा. खंडारे यांनी केले आहे.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

११ तारखेला बोरीवली तर १८ तारखेला भांडुपमध्ये रोजगार मेळावा .

मुंबई उपनगर जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचा उपक्रम .

संतोष साळसकर | सहसंपादक : मुंबई उपनगर जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र यांच्यावतीने मुंबई उपनगरांमध्ये फेब्रुवारी महिन्यात विविध ठिकाणी पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्यांचे आयोजन करण्यात आले आहे.

राज्याचे कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या हस्ते या मेळाव्यांचे उद्घाटन होणार आहे. या मेळाव्याच्या माध्यमातून नोकरी इच्छूक उमेदवारांना रोजगाराची संधी मिळणार आहे. आज शनिवारी ४ फेब्रुवारीला शहीद स्मृती क्रींडागण (व्हीनर्स जॉगर्स पार्क), पाटकर कॉलेजजवळ, उन्नत नगर, एस. व्ही. रोड, गोरेगांव (पश्चिम) येथे मेळावा सुरु झाला आहे.

या रोजगार मेळाव्याला उपस्थित राहून नोकरी इच्छूक उमेदवारांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन मंत्री श्री. लोढा यांनी केले आहे.
इयत्ता १० वी, १२ वी उत्तीर्ण, आयटीआय, पदवीधर, पदविकाधारक अशा विविध नोकरी इच्छुक उमेदवारांसाठी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये विविध नामांकित कंपन्या व नियोक्त्यांकडून रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. मेळाव्यात रिक्त पदांसाठी पात्रतेप्रमाणे उमेदवारांच्या प्रत्यक्ष मुलाखती घेण्यात येणार आहेत.

११ फेब्रुवारीला सेंट फ्रान्सिस आयटीआय माऊंट पोनसूर, एस.व्ही.रोड, हिरालाल भगवती हॉस्पिटलजवळ, बोरिवली (पश्चिम) येथे तर १८ फेब्रुवारी रोजी ऑक्सफर्ड हायस्कूल, टँक रोड, भांडूप (पश्चिम) येथे हे मेळावे होणार आहेत. या ठिकाणी सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत उपस्थित राहून याचा लाभ घ्यावा, असे आवाहन सहायक आयुक्त प्र.वा. खंडारे यांनी केले आहे.

error: Content is protected !!