28.6 C
Mālvan
Tuesday, December 3, 2024
IMG-20240531-WA0007

बाई सरपंच, उपसरपंचआणि ग्रामपंचायत सदस्य झाली…..आता पुढे काय..? ( विशेष )

- Advertisement -
- Advertisement -

सावंतवाडी तालुक्यातल्या नवनिर्वाचित महिला सरपंच,उपसरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांसाठीचे प्रशिक्षण शिबीर संपन्न.

मालवण | सुयोग पंडित : स्थानिक स्वराज्य संस्था किंवा एकंदरच महिलांनी राजकीय सहभाग घेतल्यानंतर व त्यांना संविधानिक पदाची जबाबदारी मिळाल्यानंतर त्यांच्या पुढील तांत्रिक व कायदेविषयक सुकर वाटचालीसाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यातल्या बांदा येथे
‘क्रांती ज्योती महिला प्रशिक्षण’ असे एक अनोखे प्रशिक्षण शिबीर आयोजीत करण्यात आले होते.

हे प्रशिक्षण शिबीर सावंतवाडी तालुक्यातल्या नवनिर्वाचित महिला सरपंच, महिला उपसरपंच आणि महिला ग्रामपंचायत सदस्यांसाठी मार्गदर्शनपर असा उपक्रम होता. २८ ते ३० जानेवारी असे हे प्रशिक्षण शिबीर आयोजीत केले गेले होते.

श्री मौनी विद्यापीठ ,गारगोटी येथील प्रशिक्षक रमेश चोपडे ,आजऱ्याचे अजय देशमुख सर ,कुरुकली -कागल च्या श्रीमती सविता पाटील आणि आंबेवडे -पन्हाळा गावचे आदर्श सरपंच श्री धनाजी गुरव ,यशदा पुणेचे प्रशिक्षक नारायण परब, सावंतवाडी पंचायत समिती चे बीडीओ श्री नाईक, श्री चव्हाण यांनी या ‘क्रांतीज्योती महिला प्रशिक्षण’ शिबिराला अतिशय सहज व मोकळ्या ढाकळ्या पद्धतीने मार्गदर्शन केले.

उपस्थित नवनिर्वाचित महिला सरपंच,उपसरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांना गाणी ,गोष्टी ,विनोद ,खेळ यांतून ग्रामपंचायत कायदे , नियम, योजना अशी सगळी माहिती देण्यात आली .

आजगांव सरपंच यशश्री सौदागर आणि बांदा सरपंच यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रत्येक पुष्पहार अर्पण केला व उपस्थित सर्व महिला सरपंचांनी दीपप्रज्वलन करून शिबिराचे उदघाटन केले. सुंदर गाणी, प्रार्थना, आभार आणि सहभाग प्रमाणपत्रं वितरणाने काल ३० जानेवारीला प्रशिक्षणाची यशस्वी सांगता झाली.

या शिबिराविषयी प्रतिक्रिया व्यक्त करताना आजगांव सरपंच यशश्री सौदागर यांनी म्हणले की हे शिबीर नवनिर्वाचित स्थानिक ग्रामीण स्वराज्य संस्थेच्या महिला लोकप्रतिनिधींसाठी एक नवसंजीवनी आहे कारण उपस्थित बहुतांश महिला लोकप्रतिनिधी या प्रथमच राजकारण व समाजकारणाचा अनुभव घेत आहेत आणि त्यांना स्थानिक स्वराज्य संस्थांमधील मूलभूत गोष्टी सहज लक्षात आणून दिल्या जाण्यासाठी असे शिबिर एक उत्तम वास्तुपाठ आहे तसेच ज्या महिला लोकप्रतिनिधी सदस्य पूर्वीपासून या क्षेत्रात आहेत त्यांनासुद्धा एक उजळणी वर्ग लाभला. आजगांव सरपंच यशश्री सौदागर यांनी माध्यमांशी संदेश संवाद साधून या शिबिराबद्दल आयोजकांचे व प्रशिक्षक तसेच उपस्थित सर्वांची प्रशंसा करुन आभार मानले आहेत.

या ‘क्रांती ज्योती महिला प्रशिक्षण शिबीर’ उपक्रमामुळे ‘बाई सरपंच झाली आता पुढे काय…..’ या प्रश्नाचे अगदी कृतीशील उत्तर गवसले असल्याचीच प्रतिक्रिया सामाजिक व राजकीय अभ्यासकांनी दिली आहे.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

सावंतवाडी तालुक्यातल्या नवनिर्वाचित महिला सरपंच,उपसरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांसाठीचे प्रशिक्षण शिबीर संपन्न.

मालवण | सुयोग पंडित : स्थानिक स्वराज्य संस्था किंवा एकंदरच महिलांनी राजकीय सहभाग घेतल्यानंतर व त्यांना संविधानिक पदाची जबाबदारी मिळाल्यानंतर त्यांच्या पुढील तांत्रिक व कायदेविषयक सुकर वाटचालीसाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यातल्या बांदा येथे
'क्रांती ज्योती महिला प्रशिक्षण' असे एक अनोखे प्रशिक्षण शिबीर आयोजीत करण्यात आले होते.

हे प्रशिक्षण शिबीर सावंतवाडी तालुक्यातल्या नवनिर्वाचित महिला सरपंच, महिला उपसरपंच आणि महिला ग्रामपंचायत सदस्यांसाठी मार्गदर्शनपर असा उपक्रम होता. २८ ते ३० जानेवारी असे हे प्रशिक्षण शिबीर आयोजीत केले गेले होते.

श्री मौनी विद्यापीठ ,गारगोटी येथील प्रशिक्षक रमेश चोपडे ,आजऱ्याचे अजय देशमुख सर ,कुरुकली -कागल च्या श्रीमती सविता पाटील आणि आंबेवडे -पन्हाळा गावचे आदर्श सरपंच श्री धनाजी गुरव ,यशदा पुणेचे प्रशिक्षक नारायण परब, सावंतवाडी पंचायत समिती चे बीडीओ श्री नाईक, श्री चव्हाण यांनी या 'क्रांतीज्योती महिला प्रशिक्षण' शिबिराला अतिशय सहज व मोकळ्या ढाकळ्या पद्धतीने मार्गदर्शन केले.

उपस्थित नवनिर्वाचित महिला सरपंच,उपसरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांना गाणी ,गोष्टी ,विनोद ,खेळ यांतून ग्रामपंचायत कायदे , नियम, योजना अशी सगळी माहिती देण्यात आली .

आजगांव सरपंच यशश्री सौदागर आणि बांदा सरपंच यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रत्येक पुष्पहार अर्पण केला व उपस्थित सर्व महिला सरपंचांनी दीपप्रज्वलन करून शिबिराचे उदघाटन केले. सुंदर गाणी, प्रार्थना, आभार आणि सहभाग प्रमाणपत्रं वितरणाने काल ३० जानेवारीला प्रशिक्षणाची यशस्वी सांगता झाली.

या शिबिराविषयी प्रतिक्रिया व्यक्त करताना आजगांव सरपंच यशश्री सौदागर यांनी म्हणले की हे शिबीर नवनिर्वाचित स्थानिक ग्रामीण स्वराज्य संस्थेच्या महिला लोकप्रतिनिधींसाठी एक नवसंजीवनी आहे कारण उपस्थित बहुतांश महिला लोकप्रतिनिधी या प्रथमच राजकारण व समाजकारणाचा अनुभव घेत आहेत आणि त्यांना स्थानिक स्वराज्य संस्थांमधील मूलभूत गोष्टी सहज लक्षात आणून दिल्या जाण्यासाठी असे शिबिर एक उत्तम वास्तुपाठ आहे तसेच ज्या महिला लोकप्रतिनिधी सदस्य पूर्वीपासून या क्षेत्रात आहेत त्यांनासुद्धा एक उजळणी वर्ग लाभला. आजगांव सरपंच यशश्री सौदागर यांनी माध्यमांशी संदेश संवाद साधून या शिबिराबद्दल आयोजकांचे व प्रशिक्षक तसेच उपस्थित सर्वांची प्रशंसा करुन आभार मानले आहेत.

या 'क्रांती ज्योती महिला प्रशिक्षण शिबीर' उपक्रमामुळे 'बाई सरपंच झाली आता पुढे काय.....' या प्रश्नाचे अगदी कृतीशील उत्तर गवसले असल्याचीच प्रतिक्रिया सामाजिक व राजकीय अभ्यासकांनी दिली आहे.

error: Content is protected !!