प्रसाद टोपले | क्रीडा : पहिल्या वहिल्या १९ वर्षांखालील महिलांच्या विश्वचषकाला भारतीय मुलींनी गवसणी घातली आहे.
दक्षिण आफ्रिकेत संपन्न झालेल्या क्रिकेटच्या या नव्या कोर्या प्रकल्पातील भारताने ही ऐतिहासिक कामगिरी केल्यामुळे भारतीय क्रिडा रसिकांच्या आनंदाला पारावार उरलेला नाही.
आज १९ वर्षांखालील इंग्लंड महिला संघाने प्रथम फलंदाजी करत केवळ ६८ धावा केल्या. त्यानंतर भारताने हे लक्ष्य केवळ ३ गड्यांच्या तथा विकेटच्या मोबदल्यात १७:१ षटकात पार केले. आंतरराष्ट्रीय फलंदाज आणि कर्णधार शेफाली वर्मा आज स्वस्तात तंबूत परतूनही
सौम्या तिवारी व गंगोदी त्रिशाने उत्तम फलंदाजी करत ७ विकेटनी हा सामना जिंकून दिला.
या विजया नंतर भारतातील सर्वच क्षेत्रांतून या संघावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.