बांदा | राकेश परब : पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत सावंतवाडी तालुक्यात प्रथम क्रमांक प्राप्त केलेल्या कनिष्का राजन केणी हिचा रोणापाल ग्रामस्थांकडून सत्कार करण्यात आला. रोणापाल सरपंच सौ. योगिता केणी यांच्या हस्ते कनिष्काला गौरविण्यात आले. भविष्यात आयएएस, आयपीएस अधिकारी होऊन गावाचा नावलौकिक करावा अशी अपेक्षा यावेळी माजी सरपंच सुरेश गावडे यांनी व्यक्त केली.
रोणापाल गावची कन्या कनिष्का केणी ही पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत सावंतवाडी तालुक्यात पहिली तर जिल्ह्यात आठवी आली आहे. ती सध्या सांगेली नवोदय विद्यालयात शिकत आहे. तिच्या यशाबद्दल रोणापाल ग्रामपंचायत व गावातर्फे सन्मानित करण्यात आले.
यावेळी सरपंच योगिता केणी, उपसरपंच कृष्णा परब, ग्रा. पं. सदस्य योगेश केणी, उज्वला देऊलकर, नमिता शेगडे, अश्विनी गावडे, नंदू नेमण, माजी सरपंच सुरेश गावडे, उदय देऊलकर, माजी उपसरपंच पप्या केणी, भाजपा चित्रपट आघाडीचे तालुकाध्यक्ष मोहन गवस, सदाशिव गाड, विष्णू सावंत, सागर गोठस्कर, बाबल भोगटे, ग्रामसेविका श्रीमती आळवे, ऑपरेटर सोनाली सातार्डेकर, कर्मचारी बाळू देउलकर आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
गावाने केलेला सत्कार माझ्यासाठी प्रेरणादायी आहे. मी अधिकारी व्हावे ही गावाची अपेक्षा पूर्ण करण्यासाठी मी प्रामाणिक प्रयत्न करीन. शिष्यवृत्ती परीक्षेसाठी विष्णू सावंत यांचे मार्गदर्शन मोलाचे ठरले अशी प्रतिक्रिया कनिष्का केणी यांनी दिली.