कणकवली | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महिला आर्थिक विकास महामंडळ अंतर्गत हिरकणी लोकसंचालित साधन केंद्र कणकवली स्थापित ‘कनक सखी ग्रामसंघ’ यांच्या संयुक्त विघमाने तिरंगा थाळी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.
या कार्यक्रमाला हिरकणी CMRC च्या अध्यक्ष सौ. उदयमती देसाई मॅडम, डॉक्टर वैशाली कोरगांवकर , अंगणवाडी सेविका सौ. पोयेकर व हिरकणी CMRC च्या व्यवस्थापिका सौ. सीमा गावडे , सौ. ओंबळकर, उपजीविका सल्लागार कसालकर मॅडम, ग्रामसंस्थाच्या अध्यक्ष सौ. शितल मांजरेकर , सचिव निवेदिता ढेकणे तसेच सर्व गटातील महिला उपस्थतीत होत्या. प्रथम क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला हार अर्पण व दीपप्रज्वलनाने सुरवात करण्यात आली
पोयेकर यांनी पौष्टिक तृणधान्य आहार बाबत मार्ग दर्शन केले व त्यानंतर तिरंगा थाळी पाक कला स्पर्धा परीक्षण करण्यात आले .
सूत्रसंचालन सह्योगीनी स्नेहा कदम ह्यांनी केले त्यानंतर सर्व मान्यवराचे आभार उपजीविका सल्लगार कसालकर ह्यांनी मानुन कार्यक्रम संपन्न झाल्याचे जाहिर केले. पाककले मध्ये प्रथम क्रमांक मधुरा महेश चव्हाण रोशनी गट, द्वितीय क्रमांक दीपा दत्ताराम कलिंगण रोशनी गट, तृतीय क्रमांक गौरी गणेश तारलीकर ध्रुव बचत गट यांना मिळाला.