29.4 C
Mālvan
Friday, November 22, 2024
IMG-20240531-WA0007
IMG-20241113-WA0000

‘मॅन ऑफ द मुव्हमेंट..’ चंद्रकांत विजय गोलतकर..!

- Advertisement -
- Advertisement -

सुयोग पंडित | मुख्य संपादक : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पळसंब गांवचे माजी सरपंच आणि सरपंच सेवा संघाचे मालवण तालुकाध्यक्ष श्री. चंद्रकांत विजय गोलतकर हे एक समाजाभिमुख राजकीय व्यक्तिमत्व. राजकारण हा समाजकारणाचाच एक तांत्रिक भाग आहे अशी ठाम धारणा असलेल्या चंद्रकांत गोलतकर यांचे संपूर्ण जीवन एक मुव्हमेंट तथा चळवळ आहे.

बालपणापासूनच पळसंब व परिसरातील सामाजिक व व्यावसायिक गोष्टींना तीक्ष्ण नजरेने अभ्यासून आणि समाजातील छोट्या मोठ्या तांत्रिक समस्यांना टिप कागदाप्रमाणे मनात शोषून घेऊन, वेळ आल्यावर त्यावर काहीतरी केले पाहिजे अशी पक्की खूणगाठ त्यांनी बांधली होती. कालांतराने २०१७ साली आपल्या पळसंब गांवच्या सरपंचपदी ते ‘क्रियाशील’ झाले. महत्वाचे म्हणजे चंद्रकांत गोलतकर हे कधीच ‘विराजमान’ होऊन स्वस्थपणे फर्मान सोडून कामं करायच्या संस्कृतीतील नसल्यामुळे इथे ते क्रियाशील झाले म्हणणेच योग्य ठरते.

गावातील श्री जयंती देवी रवळनाथ पंचायतन देवस्थान व जयंती कला क्रीडा मंडळ ,पळसंब यांच्या प्रत्येक सृजनशील उपक्रमांमध्ये सदैव चैतन्याने वावरणारे चंद्रकांत विजय गोलतकर यांना सरपंच सेवा संघाचे मालवण तालुकाध्यक्ष पद मिळाले तेंव्हा देखील त्यांनी त्याला पुरस्कार किंवा पद न समजता ती जबाबदारी समजली यावरुनच त्यांची एक अथकता लक्षात येते.

पोर्णिमा कन्सट्रक्शन व मोरया कला केंद्र असे दोन ‘निर्मितीक्षम’ प्रकल्प चालवताना त्यांच्यामार्फत नवनवीन प्रतिभा व रोजगार अशी दुहेरी संकल्पना त्यांनी प्रत्यक्षात व सहजपणे अंमलात आणली आहे. नेहमी काहीतरी सृजनाचे कृती अस्तित्व जपलेल्या चंद्रकांत गोलतकर यांना ‘मॅन ऑफ द मुव्हमेंट’…किंवा कृतीशील,गतीशील चळवळींचा ‘माणुस’ म्हणणेच त्यांचे योग्य वर्णन ठरेल.

‘शेती,माती आणि समाजातील घट्ट टिकवून ठेवाविशी नातीगोती’या विनम्र जिव्हाळ्याचे व बहुमुखी प्रतिमेचे धनी असलेल्या श्री.चंद्रकांत विजय गोलतकर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

( आपली सिंधुनगरी चॅनल समूह )

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

सुयोग पंडित | मुख्य संपादक : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पळसंब गांवचे माजी सरपंच आणि सरपंच सेवा संघाचे मालवण तालुकाध्यक्ष श्री. चंद्रकांत विजय गोलतकर हे एक समाजाभिमुख राजकीय व्यक्तिमत्व. राजकारण हा समाजकारणाचाच एक तांत्रिक भाग आहे अशी ठाम धारणा असलेल्या चंद्रकांत गोलतकर यांचे संपूर्ण जीवन एक मुव्हमेंट तथा चळवळ आहे.

बालपणापासूनच पळसंब व परिसरातील सामाजिक व व्यावसायिक गोष्टींना तीक्ष्ण नजरेने अभ्यासून आणि समाजातील छोट्या मोठ्या तांत्रिक समस्यांना टिप कागदाप्रमाणे मनात शोषून घेऊन, वेळ आल्यावर त्यावर काहीतरी केले पाहिजे अशी पक्की खूणगाठ त्यांनी बांधली होती. कालांतराने २०१७ साली आपल्या पळसंब गांवच्या सरपंचपदी ते 'क्रियाशील' झाले. महत्वाचे म्हणजे चंद्रकांत गोलतकर हे कधीच 'विराजमान' होऊन स्वस्थपणे फर्मान सोडून कामं करायच्या संस्कृतीतील नसल्यामुळे इथे ते क्रियाशील झाले म्हणणेच योग्य ठरते.

गावातील श्री जयंती देवी रवळनाथ पंचायतन देवस्थान व जयंती कला क्रीडा मंडळ ,पळसंब यांच्या प्रत्येक सृजनशील उपक्रमांमध्ये सदैव चैतन्याने वावरणारे चंद्रकांत विजय गोलतकर यांना सरपंच सेवा संघाचे मालवण तालुकाध्यक्ष पद मिळाले तेंव्हा देखील त्यांनी त्याला पुरस्कार किंवा पद न समजता ती जबाबदारी समजली यावरुनच त्यांची एक अथकता लक्षात येते.

पोर्णिमा कन्सट्रक्शन व मोरया कला केंद्र असे दोन 'निर्मितीक्षम' प्रकल्प चालवताना त्यांच्यामार्फत नवनवीन प्रतिभा व रोजगार अशी दुहेरी संकल्पना त्यांनी प्रत्यक्षात व सहजपणे अंमलात आणली आहे. नेहमी काहीतरी सृजनाचे कृती अस्तित्व जपलेल्या चंद्रकांत गोलतकर यांना 'मॅन ऑफ द मुव्हमेंट'...किंवा कृतीशील,गतीशील चळवळींचा 'माणुस' म्हणणेच त्यांचे योग्य वर्णन ठरेल.

'शेती,माती आणि समाजातील घट्ट टिकवून ठेवाविशी नातीगोती'या विनम्र जिव्हाळ्याचे व बहुमुखी प्रतिमेचे धनी असलेल्या श्री.चंद्रकांत विजय गोलतकर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

( आपली सिंधुनगरी चॅनल समूह )

error: Content is protected !!