27.6 C
Mālvan
Friday, September 20, 2024
Download Aarti Sangrah
ASN Ganapati AD
IMG-20240531-WA0007

‘हरी कमाई’..जिथे राबती हात तेथे हरी ! ( विशेष)

- Advertisement -
- Advertisement -

माध्यमिक विद्यामंदिर व ज्युनिअर कॉलेज कनेडी यांचा स्तुत्य प्रकल्प.

संतोष साळसकर | सहसंपादक : शालेय जीवनात स्काऊट व गाईड या उपक्रमा अंतर्गत विद्यार्थी वर्गाला ‘खरी कमाई’ नावाचा एक प्रकल्प असतो. या मध्ये स्काऊट गाईडच्या विद्यार्थी विद्यार्थिनी स्वयंसेवकांना सामाजिक तथा व्यावसायिक क्षेत्रात जात काम करुन काहीतरी आर्थिक कमवून आणण्याचे ‘टास्क’ दिले जाते. काहीजण एखाद्या दुकानात काम करतात…काहीजण एखाद्या आस्थापनात मदत करतात व जो काही मोबदला मिळेल तो शाळेतील स्काऊट व गाईडच्या गंगाजळीत जमा करतात. यामुळे स्काऊट व गाईडना जीवनातील श्रमप्रतिष्ठेचा धडा मिळावा हा उद्देश…यालाच म्हणतात ‘खरी कमाई..!’

कनेडीतील शाळेत एक वेगळा उपक्रम राबविला जातोय याला आपण ‘हरी तथा हिरवी पोषण कमाई’ म्हणू शकतो.

माध्यमिक विद्यामंदिर व ज्युनि. कॉलेज कनेडी येथे प्रधानमंत्री पोषण प्रशालेच्या या स्तुत्य उपक्रमाबद्दल शक्ती निर्माण उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहारात प्रशालेतील विद्यार्थ्यांनी स्वमेहनतीने परसबागेत पिकवलेली भाजी वितरण करण्यात आली. विशेषतः नववीतील विद्यार्थ्यांनी मेहनत करून लालभाजी, मुळा, मोहरी इत्यादी भाज्या परसबागेत पिकविल्या. श्रमप्रतिष्ठेचा व पोषणाचा एक अनोखा धडा व शिक्षण या प्रकल्पात आपसूकच मिळाले.

पालेभाज्या आहारात सेवन केल्याने जीवनसत्वाची कमतरता रहात नाही.पाचवी व आठवीच्या विद्यार्थ्यांनी भोजनात पालेभाज्यांचा आस्वाद घेतला.प्रशालेच्या या स्तुत्य उपक्रमाबद्दल क.ग.शि.प्र.मंडळ, मुंबईचे अध्यक्ष सतीश सावंत व सर्व संस्था पदाधिकारी, शालेय समिती चेअरमन आर.एच. सावंत व सर्व सदस्य, मुख्याध्यापक सुमंत दळवी, पर्यवेक्षक बयाजी बुराण, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले. या उपक्रमासाठी विद्यार्थ्यांना शिक्षिका पल्लवी हाटले, मकरंद आपटे, देवेंद्र सावंत यांचे मार्गदर्शन लाभले.

आता अशी ‘हरी कमाई’ इतर शाळांमधून घडून पोषण सक्षम विद्यार्थी विद्यार्थिनींची पिढी यापुढे तयार होण्यासाठी हा उपक्रम आदर्श ठरेल यात शंका नाही. संत सांगून गेलेतच की जिथे राबती हात तेथे ‘हरी’.!

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

माध्यमिक विद्यामंदिर व ज्युनिअर कॉलेज कनेडी यांचा स्तुत्य प्रकल्प.

संतोष साळसकर | सहसंपादक : शालेय जीवनात स्काऊट व गाईड या उपक्रमा अंतर्गत विद्यार्थी वर्गाला 'खरी कमाई' नावाचा एक प्रकल्प असतो. या मध्ये स्काऊट गाईडच्या विद्यार्थी विद्यार्थिनी स्वयंसेवकांना सामाजिक तथा व्यावसायिक क्षेत्रात जात काम करुन काहीतरी आर्थिक कमवून आणण्याचे 'टास्क' दिले जाते. काहीजण एखाद्या दुकानात काम करतात…काहीजण एखाद्या आस्थापनात मदत करतात व जो काही मोबदला मिळेल तो शाळेतील स्काऊट व गाईडच्या गंगाजळीत जमा करतात. यामुळे स्काऊट व गाईडना जीवनातील श्रमप्रतिष्ठेचा धडा मिळावा हा उद्देश…यालाच म्हणतात 'खरी कमाई..!'

कनेडीतील शाळेत एक वेगळा उपक्रम राबविला जातोय याला आपण 'हरी तथा हिरवी पोषण कमाई' म्हणू शकतो.

माध्यमिक विद्यामंदिर व ज्युनि. कॉलेज कनेडी येथे प्रधानमंत्री पोषण प्रशालेच्या या स्तुत्य उपक्रमाबद्दल शक्ती निर्माण उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहारात प्रशालेतील विद्यार्थ्यांनी स्वमेहनतीने परसबागेत पिकवलेली भाजी वितरण करण्यात आली. विशेषतः नववीतील विद्यार्थ्यांनी मेहनत करून लालभाजी, मुळा, मोहरी इत्यादी भाज्या परसबागेत पिकविल्या. श्रमप्रतिष्ठेचा व पोषणाचा एक अनोखा धडा व शिक्षण या प्रकल्पात आपसूकच मिळाले.

पालेभाज्या आहारात सेवन केल्याने जीवनसत्वाची कमतरता रहात नाही.पाचवी व आठवीच्या विद्यार्थ्यांनी भोजनात पालेभाज्यांचा आस्वाद घेतला.प्रशालेच्या या स्तुत्य उपक्रमाबद्दल क.ग.शि.प्र.मंडळ, मुंबईचे अध्यक्ष सतीश सावंत व सर्व संस्था पदाधिकारी, शालेय समिती चेअरमन आर.एच. सावंत व सर्व सदस्य, मुख्याध्यापक सुमंत दळवी, पर्यवेक्षक बयाजी बुराण, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले. या उपक्रमासाठी विद्यार्थ्यांना शिक्षिका पल्लवी हाटले, मकरंद आपटे, देवेंद्र सावंत यांचे मार्गदर्शन लाभले.

आता अशी 'हरी कमाई' इतर शाळांमधून घडून पोषण सक्षम विद्यार्थी विद्यार्थिनींची पिढी यापुढे तयार होण्यासाठी हा उपक्रम आदर्श ठरेल यात शंका नाही. संत सांगून गेलेतच की जिथे राबती हात तेथे 'हरी'.!

error: Content is protected !!