मसुरे | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जि.प.शाळा बावशी क्र. १ मधील कु. सोहम भरत कांडर या विद्यार्थ्याचा पडल्यामुळे हात फ्रॅक्चर झाला होता. सोहमची कौटुंबिक परिस्थिती गरीबीची असल्याने शिक्षक समिती कणकवलीच्या वतीने ३००० रुपयांची आर्थिक मदत शाळेतील शिक्षक विनोद ठाकूर यांच्या मागणीनुसार केली गेली.
यावेळी शिक्षक नेते गिल्बर्ट फर्नांडिस, तालुकाध्यक्ष टोनी म्हापसेकर , सरचिटणीस महेंद्र पवार , महिला आघाडी अध्यक्ष नेहा मोरे , सचिव विनिता शिरसाट , संचालक आनंद तांबे , जिल्हा कार्यालयीन चिटणीस संतोष कुडाळकर हे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.