मच्छिमार बांधव भगिनींनी या योजनेचा जास्तीतजास्त लाभ घ्यायचे केले आवाहन.
मालवण | सुयोग पंडित : राज्य शासनातर्फे बहुउद्देशीय ‘सिंधू रत्न योजना’ लवकरच चालू होत आहे त्यामुळे मच्छिमार बांधवांना एक दिलासा मिळून आनंद झाल्याचे प्रतिपादन मच्छिमार नेते पृथ्वीराज ऊर्फ बाबी जोगी यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केले.

ज्यांचे प्रस्ताव ‘चांदा ते बांदा’ योजने अंतर्गत आउट बोर्ड इंजिन इन्सुलेटर व्हेन शिल्लक राहिलेल्या लाभार्थीने मालवण फिशरीज ऑफिस येथे संपर्क साधून आपले फॉर्म भरून घ्यावेत आणि मच्छीमारांसाठी चांदा ते बांदा मध्ये असलेले प्रस्ताव जशाच्या तसे सिंधू रत्न मध्ये समाविष्ट करण्यात आले आहेत हे विशेष महत्वाचे असल्याचेही बाबी जोगी यांनी नमूद केले आहे.
या योजनेअंतर्गत बेरोजगार मच्छिमार युवावर्गासाठीही व्यावसायिक उद्देशाने हाऊट बोट ( यांत्रिक पात) घेण्यासाठी समूह तथा गृप तत्वावर सुमारे ४ लाखापर्यंतचे अर्थसहाय्य केले जाणार असल्याची माहिती पृथ्वीराज ऊर्फ बाबी जोगी यांनी दिली आहे.
मच्छिमार बांधवांच्या गरज व मागणीनुसार आणखीन काही नवीन योजना वाढवण्यात आल्या आहेत ज्या अंतर्गत मच्छी विक्रेता महिलांसाठी सुद्धा नवीन योजना तयार करण्यात आली आहे. याचा लाभ सर्व मच्छीमार भगिनींनी अवश्य घ्यावा व मच्छिमार बांधवांनी या येणाऱ्या काळात फिशिंग बोट पर्यटन व्यावसायिक,निवास निहारी यांना सुद्धा योजना द्याव्यात ही आमची एक मागणी आम्ही सिंधू रत्नाचे अध्यक्ष माननीय शिक्षण मंत्री दीपक भाई केसरकर यांच्याकडे करणार आहोत असेही पृथ्वीराज ऊर्फ बाबी जोगी यांनी स्पष्ट केले आहे.
सिंधू रत्न योजना सुरु होत असल्याबद्दल मच्छिमार नेते पृथ्वीराज ऊर्फ बाबी जोगी यांनी योजनेचे अध्यक्ष दीपकभाई केसरकर यांचे सर्व मच्छिमार बांधव व भगिनींच्या वतीने आभार मानले आहेत व प्रत्यक्षात योजना अंमलात येईल तेंव्हा प्रत्यक्ष भेट घेऊन आपण सर्व बांधव अध्यक्ष दीपकभाई केसरकर यांचे धन्यवाद करणार असल्याचे त्यांनी विशेष नमूद केले आहे.