बांदा | राकेश परब : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोलझर येथील समाजसेवा हायस्कूलचा वार्षिक पारितोषिक वितरण सोहळा नुकताच संपन्न झाला. कोलझर सरपंच सौ. सुजल गवस यांच्या हस्ते दीपप्रज्वलन व देवी सरस्वतीचे पूजन करण्यात आले.
यावेळी समन्वय समिती उपसचिव नंदकुमार नाईक, समाजसेवा मंडळ अध्यक्ष पी. पी. देसाई, निवृत्त मुख्याध्यापक दशरथ घाडी, तळकट सरपंच सुरेंद्र सावंत, कुंब्रल सरपंच जनार्दन गोरे, शालेय समिती सदस्य आपा देसाई, विकास सावंत, सुभाष बोंद्रे, शिक्षक पालक उपाध्यक्ष विलास सावळ, डी. बी. देसाई, शाम देसाई, एन. टी. देसाई उपस्थित होते.
प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी सहाय्यक शिक्षक एस. पी. परब यांच्या संगीतसाथीने ईशस्तवन सादर केले. मुख्याध्यापक सुनील राठोड यांनी प्रास्ताविक व एस. पी. परब यांनी शालेय वार्षिक अहवाल वाचन केले. प्रशालेचा आदर्श विद्यार्थी जयेश मनोजकुमार देसाई, आदर्श विद्यार्थिनी मिथीला अनिल कोलते, आदर्श खेळाडू प्रणव भिकाजी गवस व प्रगती प्रविण गवस यांना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.
विद्यार्थ्यांनी परिक्षांमध्ये यश संपादन करुन प्रशालेची उज्वल यशाची परंपरा कायम राखावी अशी अपेक्षा उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केली. कार्यक्रमाचे नियोजन सांस्कृतिक विभागप्रमुख एस. पी. परब व सुत्रसंचलन सहाय्यक शिक्षक सागर पांगुळ यांनी केले. यावेळी प्रशालेचे सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, शिक्षक पालक संघाचे सदस्य, माजी विद्यार्थी व ग्रामस्थ उपस्थित होते.