छत्रपतींच्या तामिळनाडू मधील तंज़ावर राज्याचे महाराज बाबाजी राजे..
मालवण | सुयोग पंडित : पद्मश्री परशुराम गंगावणे यांना पद्मश्री पुरस्कार प्राप्त होण्यापूर्वी व प्राप्त झाल्यानंतरही अनेक दिग्गजांनी भेट दिली आहे. पद्मश्रींच्या पिंगुळी कुडाळ येथील ठाकर आदिवासी कला आंगण संग्रहालय व आर्ट गॅलरीलाही असंख्य मान्यवर भेट देत असतातच.
अशीच एका अतिशय अनोख्या व्यक्तिने नुकतीच कला अंगणच्या आर्ट गॅलरीला भेट दिली.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या घराण्यातील तंजावर राज्याचे महाराज बाबाजी राजे यांची ती ‘मोठी भेट’ ठरली .
प्रचंड विनम्र व्यक्तिमत्व आणि आजही अत्यंत आपल्या तंजावर मधील मराठी लोकांना एक हक्काचा आधार म्हणून महाराज बाबाजी राजे सुप्रसिद्ध आहेत. “आम्ही घरी शुद्ध मराठी बोलतो”, असे सांगत महाराज बाबाजी राजे यांनी आपल्या तंज़ावर आणि महाराष्ट्राचा इतिहास पद्मश्रींच्या कुटुंबीयांना सांगितला असे पद्मश्री पुत्र चेतन गंगावणे यांनी सांगितले आहे.
पद्मश्री गंगावणे यांचा कामाचीही त्यांनी मुक्तकंठाने प्रशंसा केली.
गंगावणे कुटुंबच्या वतीने त्यांचे स्वागत व सत्कार करण्यात आला.
छत्रपती शिवाजी महाराजांचे भाऊ व्यंकोजी राजे यांनी तमिळनाडूमध्ये राज्यात तंज़ावर राज्याची स्थापना केली होती असाही इतिहास या दरम्यान महाराज बाबाजी राजे यांनी कथन केला.
या भेटीनंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील व महाराष्ट्र राज्यातील लोक कला व इतर मातिशी निगडीत कौशल्यांशी दक्षिण भारतालादेखील सहजपणे जोडले जाता यायचा एक ‘मराठी मार्ग’ खुलल्याचेही पद्मश्री परशुराम गंगावणे यांचे पुत्र चेतन गंगावणे यांनी सांगितले आहे.