श्रावण | गणेश चव्हाण : दुर्गवीर प्रतिष्ठान, महाराष्ट्र च्या सिंधुदुर्ग विभागाच्या वतीने दिनांक २४ आणि २५ डिसेंबरला किल्ले रामगड स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. दिड दिवस चाललेल्या या मोहिमेत गडाच्या इतिहासकालीन मुख्य दरवाजा( होळीचा दरवाजा) तसेच किल्ला परिसरात वाढलेली झाडीझुडपे, तटबंदीला घातक ठरणारे झाडे साफ करण्यात आली.
दुर्गवीर प्रतिष्ठान ही संस्था संपूर्ण महाराष्ट्रभर अपरिचित गडकिल्ल्यांच्या संवर्धनासाठी कार्यरत असून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण मधील रामगड, भगवंतगड या किल्ल्यावर संस्थेचे काम चालते. प्रत्येक महिन्यातील दुसऱ्या आणि चौथ्या रविवारी दुर्गवीरांच्या माध्यमातून स्वच्छता मोहिमांचे आयोजन केले जाते.
रामगड,भगवंतगडावर सातत्याने होत असलेल्या स्वच्छता मोहिमा, गडावरील सांस्कृतिक कार्यक्रम व कार्यामुळे गड पुन्हा एकदा नावारुपास येत आहेत.
आपणही छ. शिवाजी महाराजांच्या कार्याचे साक्ष असणारे हे गडकिल्ले जपण्यासाठी दुर्गवीर सोबत सहभागी होण्यासाठी चैतन्य आरेकर 9422849146 या नं.शी संपर्क साधून या या कार्यास हातभार लावावा असे आवाहन दुर्गवीर प्रतिष्ठान च्या वतीने करण्यात आले आहे.
या मोहिमेत एकूण 26 दुर्गवीरांचा सहभाग होता. मोहीम यशस्वी होण्यासाठी रवींद्र रावराणे, मधुकर विचारे, संकेत परब, सुबोध चव्हाण, तुषार चव्हाण, गणेश मालंडकर, चैतन्य आरेकर, सिद्धेश मेस्त्री, मिलिंद चव्हाण,ओंकार पालव, विनय घाडीगांवकर, शुभम घाडीगांवकर, अभिजित घाडीगांवकर, मंदार शेट्ये, प्रथमेश वरवडेकर, प्रथमेश राणे, प्रणय चव्हाण, गौरव माळकर, ओंकार परब, सहाना प्रभुदेसाई, सायली कासले, राहुल पवार, पराग दळवी, नितीन घाडीगांवकर, मनोहर गुरव, लक्ष्मण घाडीगांवकर, दीपक पावसकर आदी दुर्गवीरांनी मेहनत घेतली.