25.6 C
Mālvan
Friday, September 20, 2024
Download Aarti Sangrah
ASN Ganapati AD
IMG-20240531-WA0007

सामाजिक कार्यकर्ते अमोल तळगांवकर यांजकडून खारेपाटण केंद्रशाळेला दोन – AC (Air conditioned) भेट

- Advertisement -
- Advertisement -

खारेपाटण (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यातील खारेपाटण या गावातील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक केंद्र शाळा खारेपाटण नं.१ या शाळेला नुकतेच खारेपाटण गावातील दानशूर व्यक्तिमत्व व समजीक कार्यकर्ते श्री.अमोल जयवंत तळगावकर यांनी आपल्या दातृत्वातून सुमारे ९०,००० हजार रुपये किमतीचे असणारे दोन AC (Air conditioned शाळेला वस्तूरूप देणगीतून भेट म्हणून दिले.

खारेपाटण केंद्र शाळेचे मुख्याध्यापक श्री प्रदीप श्रावणकर सर यांच्याकडे नुकत्याच या वस्तूरूप एअर कंडिशनच्या २ मशीन (सुमारे दीड टन वजन असणाऱ्या) शाळेकडे सुपूर्द केल्या. यावेळी खारेपाटण केंद्र शाळेचे मुख्याध्यापक श्री प्रदीप श्रावणकर सर यांच्याहस्ते खारेपाटण येथील सामजीक कायकर्ते दानशूर व्यक्तिमत्व श्री अमोल तळगांवकर यांचे पुष्पगुच्छ देऊन आभार व्यक्त करण्यात आले.

खारेपाटण केंद्र शाळा ही लोकसहभागातून विविध भौतिक सुख सोयी निर्माण केलेली जिल्ह्यातील एकमेव शाळा असून सिधुदुर्ग जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या मराठी प्राथमिक शाळांमध्ये शालेय वर्गात AC उपलब्ध असणारी पहिली शाळा ठरली आहे. केंद्र शाळा खारेपाटण नं.१ च्या शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीने देखील शाळेला वस्तूरुप AC देणगी देणारे दाते श्री अमोल तळगांवकर यांचे आभार व्यक्त करण्यात आले.
“खारेपाटण केंद्र शाळा नं.१ ही शाळा राज्यातील आदर्श शाळा तथा “मॉडेल स्कूल ” म्हणून निवडली गेली असून खारेपाटण गावासाठी ही भूषणावह अशी बाब आहे.त्यामुळे खारेपाटण केंद्र शाळेला उर्जावस्था प्राप्त करून तीला उत्तरोत्तर प्रगतीकडे नेणाऱ्या या शाळेचे मुख्याध्यापक प्रदीप श्रावणकर सर व या शाळेतील शिक्षक आणि येथील शाळेसाठी झपाटून काम करणारी शाळा व्यवस्थापन समिती यांचे काम इतरांना प्रेरणादायी असे ठरत आहे. आणि या प्रेरणेतून समाजातील दातृत्व पुढे येऊन शाळेला मदत करत आहेत. त्यामुळे यापुढे देखील आपण शाळेला मदत करणार असल्याचे देखील खारेपाटण गावचे सामाजिक कार्यकर्ते व दानशूर व्यक्तिमत्व श्री अमोल तळगांवकर यांनी यावेळी सांगितले.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

खारेपाटण (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यातील खारेपाटण या गावातील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक केंद्र शाळा खारेपाटण नं.१ या शाळेला नुकतेच खारेपाटण गावातील दानशूर व्यक्तिमत्व व समजीक कार्यकर्ते श्री.अमोल जयवंत तळगावकर यांनी आपल्या दातृत्वातून सुमारे ९०,००० हजार रुपये किमतीचे असणारे दोन AC (Air conditioned शाळेला वस्तूरूप देणगीतून भेट म्हणून दिले.

खारेपाटण केंद्र शाळेचे मुख्याध्यापक श्री प्रदीप श्रावणकर सर यांच्याकडे नुकत्याच या वस्तूरूप एअर कंडिशनच्या २ मशीन (सुमारे दीड टन वजन असणाऱ्या) शाळेकडे सुपूर्द केल्या. यावेळी खारेपाटण केंद्र शाळेचे मुख्याध्यापक श्री प्रदीप श्रावणकर सर यांच्याहस्ते खारेपाटण येथील सामजीक कायकर्ते दानशूर व्यक्तिमत्व श्री अमोल तळगांवकर यांचे पुष्पगुच्छ देऊन आभार व्यक्त करण्यात आले.

खारेपाटण केंद्र शाळा ही लोकसहभागातून विविध भौतिक सुख सोयी निर्माण केलेली जिल्ह्यातील एकमेव शाळा असून सिधुदुर्ग जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या मराठी प्राथमिक शाळांमध्ये शालेय वर्गात AC उपलब्ध असणारी पहिली शाळा ठरली आहे. केंद्र शाळा खारेपाटण नं.१ च्या शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीने देखील शाळेला वस्तूरुप AC देणगी देणारे दाते श्री अमोल तळगांवकर यांचे आभार व्यक्त करण्यात आले.
"खारेपाटण केंद्र शाळा नं.१ ही शाळा राज्यातील आदर्श शाळा तथा "मॉडेल स्कूल " म्हणून निवडली गेली असून खारेपाटण गावासाठी ही भूषणावह अशी बाब आहे.त्यामुळे खारेपाटण केंद्र शाळेला उर्जावस्था प्राप्त करून तीला उत्तरोत्तर प्रगतीकडे नेणाऱ्या या शाळेचे मुख्याध्यापक प्रदीप श्रावणकर सर व या शाळेतील शिक्षक आणि येथील शाळेसाठी झपाटून काम करणारी शाळा व्यवस्थापन समिती यांचे काम इतरांना प्रेरणादायी असे ठरत आहे. आणि या प्रेरणेतून समाजातील दातृत्व पुढे येऊन शाळेला मदत करत आहेत. त्यामुळे यापुढे देखील आपण शाळेला मदत करणार असल्याचे देखील खारेपाटण गावचे सामाजिक कार्यकर्ते व दानशूर व्यक्तिमत्व श्री अमोल तळगांवकर यांनी यावेळी सांगितले.

error: Content is protected !!