मसुरे | प्रतिनिधी :
ओरोस येथे झालेल्या जिल्हास्तरीय मैदानी स्पर्धेत ४०० मी धावणे या क्रीडा प्रकारामध्ये मसुरे येथील भरतगड इंग्लिश मिडीयम स्कूलचा ७ वी मधील विद्यार्थी कु. तनिष्क महेश मुळीक याचा दुसरा क्रमांक आला आहे. सातारा येथे होणाऱ्या विभाग स्तर स्पर्धेसाठी तो जिल्ह्याचे नेतृत्व करणार आहे. तनिष्क मुळीक याच्या यशा बद्दल कौतुक होत आहे. त्याला वडील महेश मुळीक, शिक्षक स्वप्नील तांबे यांचे मार्गदर्शन लाभले.
संस्था अध्यक्ष प्रकाश परब, स्कुल कमिटी अध्यक्ष संग्राम प्रभुगावकर, डॉ. सुधीर मेहंदळे, अशोक मसुरेकर, बाबाजी भोगले, मुख्याध्यापक श्री. किशोर देऊलकर यासह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, स्कुल कमिटी, पालक व ग्रामस्थ यांनी मार्गदर्शक शिक्षक व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.