मालवण | विनीत मंडलिक :
शालेय मालवण तालुकास्तरीय स्पर्धेमध्ये स.का.पाटील मधील रामभाऊ परुळेकर कनिष्ठ महाविद्यालयाने बाजी मारत घवघवीत यश संपादन केले . यशस्वी सर्व खेळाडू विद्यार्थ्यांचे प्राचार्य. डॉ. एस. ए. ठाकूर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
तालुकास्तरीय शालेय मैदानी स्पर्धांमध्ये ४०० मीटर रनिंग मध्ये आदेश हाके याने प्रथम क्रमांक पटकावला तर ८०० मीटर रनिंग मध्ये शंकर पाटील याने तृतीय क्रमांक पटकावला. ३ किलोमीटर रनिंग यामध्ये विवेक पाटील प्रथम तर शिवम पासले याने द्वितीय क्रमांक पटकावला. तसेच ४०० मीटर रिले मध्ये मुलींच्या संघाने तृतीय क्रमांक पटकावला यामध्ये क्षितिजा खरवते, रेश्मा पांढरे, दर्शना भिसे, अनुष्का म्हापणकर या सहभागी झाल्या होत्या. सदर विद्यार्थ्यांना प्रा.हसन खान यांचे मार्गदर्शन लाभले.
यावेळी प्राचार्य. डॉ. एस. ए. ठाकूर, प्रा. डॉ. सुमेधा नाईक, प्रा. डॉ. एम. आर. खोत, प्रा. बी. एच. चौगुले, प्रा. हसन खान, प्रा. मिलन सामंत, प्रा. अन्वेशा कदम, प्रा. धामापूरकर, प्रा. गावडे, प्रा. खरात, प्रा. संकेत बेळेकर, प्रा. मेस्त्री व इतर प्राध्यापक वर्ग उपस्थित होता.