मसुरे | प्रतिनिधी : दिवंगत भजन सम्राट कोकण भूषण श्री. काशीराम परब बुवा यांच्या दहाव्या स्मृतिदिनानिमित्त भांडुप पश्चिम येथील साई हिल विभागात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यानिमित्त संगीत भजनाचा जंगी सामना आयोजित करण्यात आला होता. यावेळी सर्व शिष्य गण, परब परिवार व विजय क्रीडा मंडळ यांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाच्या प्रारंभी भजन सम्राट कोकण भूषण कै. काशीराम परब बुवा यांच्या प्रतिमेस मान्यवरांनी पुष्पहार अर्पण केला.
भजन बारीचा सामना भारतरत्न पंडित भीमसेन जोशी युवा पुरस्कार प्राप्त सुरंजन खंडाळकर पुणे विरुद्ध पंडित शंकरराव वैरागकर यांचे पट्टशिष्य इंडियन आयडॉल मराठी उपविजेते जगदीश चव्हाण नाशिक यांच्यात झाला. सुरंजन खंडाळकर यांना तबला कौस्तुभ तळेकर, तर पखवाज वादक ऋषिकेश शिंदे यांनी साथ दिली. जगदीश चव्हाण याना चेतन तरे यांनी तबला, तर पखवाज म्हणून सागर कोकतरे यांनी साथ केली.
कार्यक्रमाला बुवा भगवान लोकरे, आमदार रमेश कोरगावकर, शाखाप्रमुख राजेश कदम, ईशान्य मुंबई शिवसेना महिला विभाग प्रमुख राजश्री राजन मांदविलकर, भांडुप विभाग संघटक नेहा पाटकर, दिलिप जोगळेकर, नंदकुमार पाटकर, बुवा चंद्रकांत देसाई, बुवा बाळकृष्ण परब, बुवा संजय गावडे, बुवा प्रमोद टक्के, बुवा रामकृष्ण , नंदकिशोर रासम, शेखर जाधव, धोंडी परब, अनंत सावंत, प्रदीप काटकर, प्रसाद सोगम, शंकर चव्हाण, बाबू गावकर, बाबी काराणे, बुवा सुयश काराणे , शिष्यगण, मित्रपरिवार उपस्थित होते.
विजय क्रीडा मंडळाचे अध्यक्ष संतोष कासले, बाळा आंगणे, विवेक सावंत, सुरेश धुरी तसेच सार्वजनिक उत्सव समिती साई हिल व श्री स्वामी समर्थ मठ व काराणेवाडी कट्टा ग्रामस्थ मंडळ यांचे योगदान लाभले.