मालवण | सुयोग पंडित : आंतरराष्ट्रीय क्रिकेट जगतातील सर्वोत्कृष्ट अष्टपैलू खेळाडुंपैकी एक म्हणून सुप्रसिद्ध असलेल्या आणि इंग्लंड क्रिकेट संघाचा माजी कसोटीवीर कर्णधार फ्रेडी उर्फ अँड्र्यू फ्लिंटॉफ याचा काल सरे परगण्यामध्ये (काऊंटीमध्ये) भीषण अपघात झाला आहे. बीबीसीच्या एका साहसी मालिकेच्या चित्रिकरणा दरम्यान फ्लिंटॉफचा भीषण अपघात झाला.
त्यानंतर फ्लिंटॉफला एअरलिफ्ट करून रुग्णालयात दाखल करण्यात आले. ४६ वर्षीय माजी अष्टपैलू फ्लिंटाॅफच्या कारला जरी भीषण अपघात झाला तरी त्यातून तो आश्चर्यकारकरित्या बचावला आहे. तपासणी अंती त्याला कोणतीही गंभीर दुखापत झाली नाही असे सूत्रांकडून समजते आहे.
ऑस्ट्रेलियाचा माजी अष्टपैलू खेळाडू अँड्र्यू सायमंड्सचा याच वर्षी कार अपघातात मृत्यू झाला होता आणि २००२/०३ साली माजी इंग्लिश कसोटीपटू बेन होलीओक तसेच विंडिजचा माजी कसोटीपटू रुनॅको माॅर्टन यांचा अपघाती मृत्यू झाला होता.
फ्लिंटाॅफच्या निवृत्तीनंतर त्याने बाॅक्सिंग, पॅराग्लायडींग, गिर्यारोहण ,वेट लिफ्टिंग, ‘फाॅर्म्युला २’ कार शर्यत अशा अनेक क्षेत्रातील विविध साहसी शारिरीक आव्हाने घेऊन त्यावर विविध मालिकांचे चित्रीकरण करण्यात आले आहे. बी.बी.सी.च्या अशाच एका साहसी प्रकल्पाच्या चित्रीकरणा दरम्यान हा अपघात झाला.
आंतरराष्ट्रीय क्रिकेट मधील निवृत्तीनंतर तीन वर्षांनी त्याने ऑस्ट्रेलियाच्या बिग बॅश लीगमध्ये ब्रिस्बेन हीटस् कडून खेळताना क्रिकेटमध्ये पुनरागमन केले होते परंतु त्यावेळी तो फारसा प्रभावी ठरला नाही. २००९ साली दक्षिण आफ्रीकेतील आय.पि.एल.स्पर्धेत तो चेन्नई सुपरकिंग्जचा हिस्सा होता परंतु तेंव्हाही त्याला दुखापतीमुळे संपूर्ण स्पर्धा खेळता आली नव्हती.
बीबीसीचा शो टॉप गीयरच्या शूटिंग दरम्यान सोमवारी फ्लिंटॉफचा अपघात झाला. बीबीसीनं आपल्या निवेदनात म्हटलंय की, “टॉप गीयर टेस्ट ट्रॅक दरम्यान सोमवारील सकाळी फ्लिंटॉफचा अपघात झाला होता.
फ्लिंटॉफ ट्रॅकवर नॉर्मल स्पीडमध्ये ड्राईव्ह करत होता. २०१९ साली टॉप गीयरच्याच एका भागाचे शुटींग करत असताना देखील फ्लिंटॉफचा अपघात झाला होता.