25.6 C
Mālvan
Friday, September 20, 2024
Download Aarti Sangrah
ASN Ganapati AD
IMG-20240531-WA0007

मालवण न.प. मुख्याधिकारी शहराच्या बाबतीत उदासीन असल्याची माजी नगराध्यक्ष महेश कांदळगांवकर यांची पालकमंत्र्यांकडे लेखी तक्रार.

- Advertisement -
- Advertisement -

मालवण | सुयोग पंडित : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष महेश कांदळगांवकर यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री ना.रविंद्र चव्हाण यांच्याकडे मालवण न.प.प्रशासनाबाबत लेखी तक्रार दिली आहे.

माजी नगराध्यक्ष महेश कांदळगांवकर यांच्या लेखी तक्रारीनुसार मालवण नप मध्ये सध्या माननीय संतोष जिर्गे हे मुख्याधिकारी म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्याकडेच प्रशासक पदाचा कार्यभार देखील आहे. माजी नगराध्यक्ष महेश कांदळगांवकर व सहकार्यांचा नप मधील पाच वर्षांचा कार्यकाल २० डिसेंबर २०२१ ला संपलेला होता. प्रशासकीय कार्यकाळाला जवळपास एक वर्ष पूर्ण होत आलेले आहे परंतु मागच्या वर्षभरात कांदळगांवकर व सहकारी यांच्या कालावधीत सुव्यववस्थीत झालेली विकास कामे, कचरा व्यवस्थापन , स्ट्रीट लाईट व्यवस्था इत्यादी बाबत सध्या प्रशासकीय कामकाजात अक्षम्य दुर्लक्ष होत चाललेला आहे असा आरोप महेश कांदळगांवकर यांनी पत्रामधून केला आहे.
वेळोवेळी सूचना करून, लेखी देऊनही याबाबत कोणतीही कार्यवाही केली जात नाही आणि नप निवडणूका न झाल्याने अजूनही आमच्या कालावधीतील लोकप्रतिनिधी कडून लोकांच्या कामाच्या अपेक्षा आहेत असे महेश कांदळगांवकर यांनी स्पष्ट केले. जनतेची कामे करणे ही आमची नैतिकता पण आहे व काम न झाल्यास ते अजूनही आम्हालाच जबाबदार धरणार आहेत हा मुद्दा अजूनही मुख्याधिकारी यांनी लक्षात घ्यावा असा सल्ला महेश कांदळगांवकर यांनी दिला आहे.

स्वच्छते बाबत ढिसाळ नियोजन , बायो टॉयलेट गाड्या वापरविना पडून असणे , मैला सक्शन गाडीचे अयोग्य नियोजन, बंद असलेली डास फवारणी , पर्यटन हंगाम सुरु होऊनही पार्कींग व्यवस्थेविषयी ठोस कार्यवाही नाही , दिशादर्शक फलकांतील स्थानांच्या त्रुटी, फोवकांडा पिंपळावरील फाऊंटन बंद अवस्थेत असणे, बंद पडलेल्या हायमास्टची दुरुस्ती न करणे, भाजी मार्केट / मल्टिपर्पज हॉल चे काम बंद , मत्स्यालय, भुयारी गटर योजना बाबतीत पुढील प्रगती नसणे, कचर्यापासून खत निर्मिती मशीन बंद असणे, मासे मार्केट वरील गाळ्यांचा लिलाव झाला नाही अशा अनेक मुद्द्यांची लेखी तक्रार माजी नगराध्यक्ष महेश कांदळगांवकर यांनी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

न.प.प्रशासनाकडून पत्र, नोटिसा, दंड ही प्रशासकीय प्रक्रिया राबवली जात आहे पण निधी उपलब्ध करुन देऊनही जर नियोजीत कामे होत नसतील तर विकासाच्या मूळ उद्देशाला हरताळ फासल्यासारखं होत असल्याचेही महेश कांदळगांवकर यांनी पत्रात लिहीले आहे. लोकप्रतिनिधींचा कार्यकाळ संपल्यानंतर सगळ्याच विकास कामांना ब्रेक लागला आहे अशीच सध्या परिस्तिथी आहे. प्रसंगी त्या त्या प्रभागातील लोकप्रतिनिधी, नैतिक जबाबदारी म्हणून स्वतःच्या पैशाने लोकांची यथाशक्ती कामे करायचा प्रयत्न करत आहेत परंतु ते व्यापक प्रमाणावर शक्य नसल्याचे स्पष्टीकरण माजी नगराध्यक्ष महेश कांदळगांवकर यांनी दिले आहे.
याबाबत वेळोवेळी सूचना करूनही माननीय मुख्याधिकार्यांकडून कडून ठोस अशी कार्यवाही केली जात नाही असे निदर्शनास आले आणि मुख्याधिकारी आणि प्रशासक हे पद एकाच व्यक्ती कडे असल्याने ही परिस्तिथी निर्माण होत आहे अशी आपली व सहकार्यांची स्पष्ट धारणा आहे असे मत महेश कांदळगांवकर पत्रात यांनी नमूद केले आहे.
या सर्व कामांबाबत एक महिन्यांपूर्वी कळवूनही यात कुठलीही सुधारणा झालेली नाही. आता याबाबत पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी त्यांच्या अधिकारीक स्तरावर माहिती घेऊन आवश्यक ती कार्यवाही प्रस्तावित करावी अशी विनंती मालवणचे माजी नगराध्यक्षमहेश कांदळगांवकर यांनी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांना दिलेल्या पत्रात केली आहे.

मालवण नप च्या स्वच्छता, लाईट, विकासकामे या बाबत नप उदासीन असलेबाबत ११ नोव्हेंबर ०२२ ला लेखी जाहीर नाराजी व्यक्त केली होती. याला महिनाभर कालावधी उलटूनही या प्रलंबित कामात म्हणावे तशी प्रगती झालेली दिसली नाही . मुख्याधिकारी यांची पण उदासीनता दिसून येत असल्याने या सर्व बाबी पालकमंत्री यांच्या कडे लेखी पत्राने कळवून याबाबत पालकमंत्री यांनी माहिती घेऊन आपल्या स्तरावर पुढील कार्यवाही, आदेश निर्गमित करावे अशी विनंती करण्यात आली आहे. कामकाजाबाबत वेळोवेळी सूचित करूनही सकारात्मक प्रतिसाद मिळत नसल्याने,माननीय मुख्याधिकारी शहराच्या विकासाच्या तथा सुव्यवस्थेच्या बाबतीत प्रचंड उदासीन आहेत अशी खंत माजी नगराध्यक्ष महेश कांदळगांवकर यांनी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या कडे पत्राद्वारे व्यक्त केली आहे.

आता यावर मालवण नगरपरीषद प्रशासन काय पावलं उचलणार तसेच पालकमंत्री कोणती कार्यवाही करणार किंवा याचे काय स्पष्टीकरण येणार हे पहाणे सध्या मालवण वासियांच्या चर्चेचा विषय आहे.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!