साळशी सरपंच वैभव साळसकर यांचे ते वडिल आणि माजी सरपंच विजया साळसकर यांचे ते पती होत.
देवगड तालुक्यासह सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शैक्षणिक,सामाजिक व राजकीय क्षेत्रातून व्यक्त होतोय शोक.
संतोष साळसकर | ब्युरोचीफ : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातल्या साळशी येथील रहिवाशी तथा सेवानिवृत्त मुख्याध्यापक मनोहर जनार्दन साळसकर (साळसकर गुरुजी) यांचे आज १३ डिसेंबरला अल्पशा आजाराने निधन झाले. ते ८६ वर्षांचे होते.
जि.प.केंद्र शाळा साळशी याप्रशालेत मुख्याध्यापकपदी सेवानिवृत्त झाले. तसेच ते साळशी ग्रामपंचायत सदस्य होते.
त्यांच्या पश्चात पत्नी, २ मुलगे,१ विवाहित मुलगी, सुना,२ भाऊ,पुतणे,नातवंडे असा परिवार आहे. साळशी ग्रामपंचायत सरपंच वैभव साळसकर यांचे वडील तर माजी सरपंच विजया साळसकर यांचे ते पती होत.त्यांच्या अंत्ययात्रेला सर्वच स्तरातील मान्यवर उपस्थित होते.
मनोहर साळसकर यांच्या निधनाने देवगड तालुक्यासह सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शैक्षणिक,सामाजिक व राजकीय क्षेत्रातून शोक व्यक्त होत आहे.