सिंगल सिगारेटच्या विक्री बंद होण्याची शक्यता..!
दिल्ली | वृत्तसंस्था : देशातील सिंगल सिगरेटच्या विक्रीवर लवकरच बंदी येण्याची शक्यता आहे. तंबाखूच्या सेवनामुळे देशातील कॅन्सरग्रस्तांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर संसदीय स्थायी समितीने सिंगल सिगारेटच्या विक्रीवर बंदी घालण्याचा प्रस्ताव दिला आहे. तंबाखू नियंत्रण मोहिमेसाठी हे फायद्याचे ठरू शकते असे समितीने या प्रस्तावात नमूद केले आहे.
तंबाखू उत्पादन आणि मद्य सेवनावर बंदी आणावी, अशी शिफारस संसदीय समितीने करतानाच सिंगल सिगरेटच्या विक्रीवर बंदी घालावी, असे म्हटले आहे. सिंगल सिगारेटच्या विक्रीमुळे त्याच्या विक्रीत वाढ होत आहे. तसेच विमानतळावरचे स्मोकिंग झोन बंद करण्याची शिफारस देखील करण्यात आली आहे.