कुडाळ | ब्युरो न्यूज : गेले काही दिवस सिंधुदुर्ग जिल्ह्यातील टोल प्रश्नावर बहुपक्षीय नेते व व्यापारी तसेच सर्व स्तरातील नागरीक सनदशीर व सामूहीक लढा देण्यासाठी चर्चात्मक स्वरुपात एकवटले होते. याच्या प्रत्यक्ष व पुढील टप्प्यात काल कुडाळ येथे सिंधुदुर्ग टोलमुक्ती साठी सामूहिक व व्यापक बैठक झाली.
सिंधुदुर्गात सुरू होणार्या टोलला रोखण्यासाठी सर्वांनी एकत्र येवून लढा देण्याची तयारी ठेवली पाहिजे, असा सूर आज येथे झालेल्या विविध पक्षाचे पदाधिकारी व संघटनांच्या बैठकीत घेण्यात आला. टोलविरोधी आंदोलनाची व्याप्ती वाढली पाहिजे. यासाठी या समितीत तरुणांना स्थान देण्याचा निर्णय घेण्यात आला. यावेळी जाहीर करण्यात आलेल्या अस्थायी समितीच्या अध्यक्षपदी सतीश लळीत यांची निवड करण्यात आली. यावेळी जिल्हा व्यापारी महासंघाचे अध्यक्ष प्रसाद पारकर, माजी आमदार परशुराम उपरकर, कोल्हापूर टोलमुक्त समितीचे गिरीश फोंडे, जिल्हा व्यापारी महासंघाचे नितीन वाळके, कुडाळ व्यापारी संघटना अध्यक्ष,श्रीराम शिरसाट, द्वारकानाथ घुर्ये, सतीश लळीत, एमआयडी असो. राजन नाईक, शिवाजी घोगळे, संजय भोगटे, पी. डी. शिरसाट, गिरीश फोंडे, संजय भोगटे, ईर्शाद शेख, हेमंत मराठे, तसेच जिल्ह्यातील विविध संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.