भारतीय किसान संघाच्या वतीने १९ डिसेंबरला दिल्ली येथे भव्य किसान गर्जना रॅलीचेही आयोजन.
कुडाळ | देवेंद्र गावडे ( उपसंपादक ) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळच्या
भारतीय किसान संघाच्या वतीने १९ डिसेंबर, २०२२ रोजी दिल्ली येथे भव्य किसान गर्जना रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.
या रॅलीमध्य विविध मागण्या करण्यात येणार आहेत. या मागण्या सर्वसामान्य शेतक-यांपर्यंत पोहचवण्यासाठी काल ६ डिसेंबरला भारतीय किसान संघ, कुडाळच्या वतीने संपर्क यात्रा आयोजित करण्यात आली.
या किसान गर्जना रॅलीमध्ये पुढील मागण्या करण्यात येणार आहेत..
१) उत्पादन खर्चावर आधारीत (सर्व उत्पादन खर्च+५०%नफा) लाभकारी मुल्य देणारा कायदा करण्यात यावा.
२) शेतीला लागणारी निविष्ठा, औजारे यावरील GST रद्द करण्यात यावा.
३) किसान सन्मान निधीमध्ये पुरेशी वाढ करण्यात यावी.
४) रासायनिक खतांच्या कंपन्यांना दिले जाणारे अनुदान शेतक-यांप्रती थेट डि.बी टी.द्वारे द्यावे.
या सर्व मागण्या शेतक-यांपर्यंत पोहचवण्यासाठी भारतीय किसान संघ, कुडाळ तालुक्याच्या वतीने शेतकरी संपर्क यात्रा काढण्यात आली. ज्यामूळे शेतक-यांना एक जनजागृतीपर अनुभव घेता आला. यावेळी २५ गावांमध्ये १२०० पत्रके व ४० पुस्तिकांचे वितरण करण्यात आले.
या यात्रेमध्ये सर्व तालुका पदाधिकारी व ग्रामसमिती सदस्य सहभागी झाले होते. उपस्थित सर्व शेतक-यांनी किसान रॅलीच्या मागण्यांना आपला उत्स्फूर्त पाठींबा दर्शवला आहे.