संतोष साळसकर | ब्युरोचीफ : वामनराव महाडिक माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, तळरे याठिकाणी जागतिक दिव्यांग दिन साजरा करण्यात आला. यावेळी गटसंधान केंद्र कणकवलीचे विषेशतज्ज्ञ भाऊसाहेब कापसे, नितीन पाटील,नितेश तेली, साळिस्ते केंद्र मुख्याध्यापक सत्यवान घाडीगावकर, शाळा समिती सदस्य शरद वायंगणकर,प्रशालेचे प्राचार्य अविनाश मांजरेकर, शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारीवृंद व विद्यार्थी उपस्थित होते. जागतिक दिव्यांग दिनाचे औचित्य साधून प्रशालेतील दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी रंगभरण स्पर्धा आयोजित करण्यात आली. या स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला. तसेच वामनराव महाडीक विद्यालयाच्या विध्यार्थ्यांनी आपल्या दिव्यांग विद्यार्थी बंधूंना आपल्या हक्कांची आणि समाजाला कर्त्यव्यांची जाणीव व्हावी यासाठी जनजागृतीपर प्रभात फेरी काढण्यात आली. यावेळी ‘दिव्यांगांचे शिक्षण-प्रगतीचे लक्षण , दिव्यांगांना साथ द्या- मदतीचा हात द्या , दिव्यांगांना शिकवू-समाजात त्यांना टिकवू’ अशा प्रकारच्या घोषणाही देण्यात आल्या. गट संधान केंद्र कणकवली व वामनराव महाडीक विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने दिव्यांग विध्यार्थ्यांचा शाळेतील आनंद द्विगुणित व्हावा याउद्देशाने उंच उडी, पेल्यात नाणे टाकणे, धावणे(रिले), संगीत खुर्ची अशाप्रकारच्या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या उत्तरार्धात प्रशालेच्या एम.डी.देसाई सांस्कृतिक भवनामध्ये बक्षीस वितरणाच्या कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व सरस्वती पूजनाने झाली. गटसंधान केंद्र कणकवलीचे भाऊसाहेब कापसे यांच्या कार्याला सलाम देत प्रशालेच्यावतीने त्यांचा शाल, श्रीफळ व गुलाबपुष्प देऊन त्यांचा उचित सन्मान सत्कार करण्यात आला, प्रशालेतील दिव्यांग विद्यार्थ्यांना पदक व शैक्षणिक वस्तू देवून गौरिवण्यात आले. याप्रसंगी माणूस शरीराने नाही तर मनाने अपंग असू नये आणि हेच मानसिक अपंगत्व त्याचा प्रगतीचा अडसर बनते , अपंग व्यक्तींचा मनापासून आदर करायला आपण सजग असलं पाहिजे असे प्रतिपादन प्राचार्य अविनाश मांजरेकर यांनी आपल्या प्रास्ताविकातून करत कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट केला. पदाधिकारी भाऊसाहेब कापसे यांनी दिव्यांग विद्यार्थ्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात राहूनच शिक्षण दिले पाहिजे,सर्वसाधारण मुले आणि दिव्यांग मुले यांच्यामध्ये फरक करू नये असे सांगितले. यावेळी गट साधन केंद्र या कणकवलीचे नितीन पाटील व नितेश तेली यांनी आपले मनोगत व्यक्त केले. मान्यवरांच्या हस्ते विजेत्या स्पर्धकांचा गौरव करण्यात आला.
स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे- रंगभरण स्पर्धा– प्राथमिक गट-प्रथम क्र. रिषभ चव्हाण,द्वितीय-अमृता तळेकर,तृतीय-तेजस जंगले,माध्यमिक गट- प्रथम क्र. विश्वजीत चव्हाण, द्वितीय-भाग्येश पाटकर,उंचउडी-प्रथम क्र. रोहन कुलकर्णी, द्वितीय- भाग्येश पाटकर, तृतीय- दीप कुमठेकर, पेल्यात नाणे टाकणे– प्रथम क्र. चैत्रा खटावकर, द्वितीय- विश्वजीत चव्हाण, संगीत खुर्ची-प्रथम क्र.रिषभ चव्हाण, द्वितीय-भाग्येश पाटकर,तृतीय-दीप कुमठेकर, धावणे प्रथम क्र.विश्वजीत चव्हाण,द्वितीय क्र.दीप कुमठेकर,तृतीय क्र.अमृता तळेकर, उत्तेजनार्थ ( विभागून)-चैत्रा खटावकर,तेजस जंगले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशालेची विद्यार्थिनी कु.सुस्मिता गुरव हिने तर आभार प्रशालेची विद्यार्थिनी कु.सायली बांदिवडेकर हिने मानले. प्रशालेच्या सहा.शिक्षिका डी.सी.तळेकर व प्राध्यापिका एस.एन.जाधव यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.