मालवण | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण शहरात, काल ६ डिसेंबरला ‘महापरिनिर्वाण दिनानिमित्त’ उद्धव ठाकरे गट शिवसेनेच्या वतीने बांगीवाडा समाजमंदिर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून स्मृती वंदना दिली गेली.
यावेळी पालिकेचे माजी बांधकाम सभापती व माजी नगरसेवक मंदार केणी, शहर प्रमुख पृथ्वीराज उर्फ बाबी जोगी, युवा सेना तालुका समन्वयक मंदार ओरसकर, तपस्वी मयेकर,भाई कासवकर, यशवंत गावकर, दीपा शिंदे, नरेश हुले, सन्मेष परब यांच्यासह अन्य पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.