सुप्रसिद्ध अभिनेता निलेश पवार यांचे विशेष संबोधन.
संतोष साळसकर | ब्युरोचीफ : ६ डिसेंबर हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा ६६ वा महापरिनिर्वाण दिन वाडा येथील लुंबिनी बुद्ध विहारमध्ये अभिवादन पर सभा घेऊन संपन्न झाला. २०गावांचे कार्यक्षेत्र असलेल्या गावातील प्रमुख पदाधिकाऱ्यांनी यात सहभाग घेतला होता. तथागत गौतम बुद्ध आणि विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन करून पुष्प अर्पण करण्यात आली .या अभिवादन कार्यक्रमासाठी सुप्रसिद्ध अभिनेते निलेश पवार ,सेवा संघाचे अध्यक्ष सूर्यकांत साळुंखे ,प्रबुद्ध सेवा संघाचे अध्यक्ष पि.के. वाडेकर,सरपंच सुनिल जाधव, दिलीप वाडेकर, महिला सेवा संघाच्या सरचिटणीस तनवी पडेलकर, सल्लागार आरती कदम, भक्ती साळुंखे, नमिता कांबळे, सुरभी पुरळकर, सरचिटणीस विश्वनाथ पडेलकर, सल्लागार के. एस. कदम, अनिल पुरळकर, स्वाती वाडेकर, पडेल बँक शाखा धिकारी अतुल पडेलकर, संतोष गिरकर, सचिन गिरकर, मिलिंद गिरकर, रुपेश पुरळकर असे अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. यानंतर धम्म चळवळीचे प्रचार आणि प्रसाराचे काम करणाऱ्या अनेक मान्यवर पदाधिकाऱ्यांचे पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. त्यानंतर सामाजिक, आर्थिक, राजकीय दृष्ट्या देशाला अमूल्य असे योगदान देऊन भारतीय संविधान ही अमूल्य देणगी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिली. याच संविधानाची अमृत महोत्सवी वाटचाल या विषयावरती के. एस. कदम, पि. के. वाडेकर, अनिल पुरळकर, प्रमोद वाडेकर, पि. वाय. कांबळे यांनी विचार मांडले. या विषयावरील मुख्य भाषणात सुप्रसिद्ध अभिनेते व वक्ते निलेश पवार यांनी सविस्तर विचार मांडले. भारतीय संविधान ज्या दिवशी लागू झाले तो दिवस भारतीयांसाठी क्रांती होती असे परखड विचार मांडून भारतीय संविधानाने दिलेली लोकशाही ही सबंध विश्वामध्ये महत्वपूर्ण समजली जाते. डॉक्टर बाबासाहेबांनी आपल्या आयुष्याच्या शेवटच्या पाच-सहा वर्षांमध्ये या देशाला तीन रत्न दिले. त्यापैकी भारतीय संविधान, गणराज्य व्यवस्था आणि तिसरे रत्न म्हणजे या देशातील उपेक्षित, शोषित, वंचित यांना दिलेली बौद्ध धम्माची दीक्षा ही होत. या तीनही रत्नांचे सविस्तर विश्लेषण आपल्या भाषणात त्यांनी केले. मताधिकार हा आपला मानवी हक्क आहे तो आपण जबाबदारीने बजावला पाहिजे याचीही या वेळेला त्यांनी जाणीव करून दिली. जागे व्हा, जागृत रहा, आपला दृष्टिकोन बदलून सकारात्मक बनवा. पराभूत मानसिकता सोडून द्या असे सांगून अमेरिका, इंग्लंड या सारख्या प्रगत देशातील विचारवंतांनी देखील भारतीय संविधान आणि इथल्या लोकशाही मुल्यांचे महत्त्व जपले आहे अशी अनेक उदाहरणे दिली.
त्यानंतर विद्यानंद शिरगावकर सामाजिक कार्यकर्ते यांनी अत्यंत मोजक्या शब्दात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा विचार सांगून त्यांना अभिवादन केले. शेवटी अध्यक्षीय भाषणात सूर्यकांत साळुंखे यांनी बाबासाहेबांना अभिवादन करून तालुका संघटना व प्रबुद्ध सेवा संघ यांच्या सामूहिक प्रयत्नातून धम्मदीक्षा वाडा या ठिकाणी विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकर यांचे भव्य शिल्प उभारण्याचा संकल्प करण्याचा करण्याचा विचार मांडला. तालुका संघटना करत असलेल्या विविध उपक्रमांचा उल्लेख करून संघटनेची वाटचाल योग्य दिशेने होत असल्याची देखील भाषणातून मांडणी केली. यानंतर दुपारच्या सत्रात जिल्ह्यातील लोक कलावंतांनी गीत गायनातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले यात राजन धवडकर, नमिता कांबळे, मिलिंद जामसंडेकर, तनवी पडेलकर, दिलीप वाडेकर, सूर्यकांत साळुंखे यांनी बाबासाहेबांच्या कर्तृत्वाचा विशेष गौरव असलेली गीते सादर केली. या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सेवा संघाचे सरचिटणीस विश्वनाथ पडेलकर यांनी केले.