मुंबई | ब्यूरो न्यूज : कोकण रेल्वेच्या मार्गावर आज बुधवार पासून प्रथमच कंटेनर ट्रेन वाहतूक सुरू होतेय. या मार्गावरील पहिली ट्रेन आज ३० नोव्हेंबर रोजी सायंकाळी साडे चार वाजता रत्नागिरी स्थानकातून रवाना होत आहे.कोकण रेल्वेचे व्यवस्थापकीय संचालक संजय गुप्ता ,डायरेक्टर ऑपरेटिंग संतोष कुमार झा,मुख्य वाणिज्य व्यवस्थापक एल के वर्मा,विभागीय व्यवस्थापक रवींद्र कांबळे,गद्रे मरिन एक्स्पोर्ट संचालक दिपक गद्रे,संचालिका मीना गद्रे यांच्या उपस्थितीतीत या कंटेनर ट्रेन ला झेंडा दाखवण्यात येईल.
कोकण रेल्वेच्या रत्नागिरी स्थानकातुन सायंकाळी हि ट्रेन रवाना होत आहे.