28.6 C
Mālvan
Tuesday, December 3, 2024
IMG-20240531-WA0007

वामनराव महाडीक विद्यालय व नेहरू युवा केंद्र सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने संविधान दिन साजरा..!

- Advertisement -
- Advertisement -

संतोष साळसकर | ब्युरोचीफ :
वामनराव महाडिक माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय,तळेरे व नेहरु युवा केंद्र सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने
तळेरे येथील डॉ. एम.डी.देसाई सांस्कृतिक भवनात २६ नोव्हेंबर २०२२ या दिनी संविधान दिन साजरा करण्यात आला. याप्रसंगी नेहरू युवा केंद्र,सिंधुदुर्ग चे कणकवली तालुका समन्वयक सुजय जाधव,अक्षय मोडक आणि श्रद्धा चव्हाण यांच्या सहयोगाने हा दिन साजरा झाला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला भारताच्या संविधान उद्देशिकेचे वाचन करण्यात आले. प्रशालेचे ज्येष्ठ शिक्षक सी.व्ही. काटे यांनी आपल्या प्रास्ताविकातून संविधान दिनाबद्दल माहिती दिली. कणकवली तालुका समन्वयक सुजय जाधव यांनी सर्व विद्यार्थ्यांना आपल्या व्याख्यानातून भारतीय संविधानाचे महत्त्व आणि संविधानाविषयी विद्यार्थ्यांबरोबर सुसंवाद साधला.
याच दिवशी कनिष्ठ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठीसंविधान प्रश्नमंजुषा स्पर्धा घेण्यात आली.या स्पर्धेमध्ये प्रथम तीन क्रमांकांना प्रशालेचे प्राचार्य अविनाश मांजरेकर यांच्या हस्ते सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. युवकांमध्ये नेतृत्व गुण वाढीसाठी नेहरू युवा केंद्र नेहमीच अग्रेसर असते अश्या शब्दांत नेहरू युवा केंद्राच्या कार्याबद्दल प्रशंसा करण्यात आली. प्रथम क्रमांक कु.मिताली गोपाळ चव्हाण,द्वितीय क्रमांक कु.अनुष्का सुभाष घाडी, तृतीय क्रमांक कु.श्रावणी हिरोजी तळेकर तसेच सर्व सहभागी विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले . वाणिज्य शाखेचा विद्यार्थी कु. विराज संजय नांदलस्कर या विद्यार्थ्यांने भारताचे संविधान या विषयावर खूप छान अशी स्वरचित कविता सादर केली. तसेच सदर कार्यक्रमावेळी एक उत्स्फूर्त संविधानावर आधारित प्रश्न विचारला गेला आणि याचे उत्तर कु.सिद्धार्थ यशवंत जठार याने दिले याबद्दल नेहरू युवा केंद्र, सिंधुदुर्ग यांच्यावतीने त्याला एक पुस्तक भेट स्वरूपात देऊन गौरविण्यात आले.
कार्यक्रमा वेळी प्रशालेचे प्राचार्य अविनाश मांजरेकर, प्रशालेचे ज्येष्ठ शिक्षक सी.व्ही. काटे,विद्यालयाचे सर्व शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी,विद्यार्थी उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे नियोजन प्रा.एस.एन.जाधव व प्रा. एन.पी.गावठे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रद्धा चव्हाण तर आभारप्रदर्शन प्रा.एस.एन.जाधव यांनी केले.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!