27.5 C
Mālvan
Thursday, November 21, 2024
IMG-20240531-WA0007
IMG-20241113-WA0000

आत्महत्या ते सहकारी शेती ….’मेरे देश की धर्ती..!’ ( सिनेमा समिक्षण )

- Advertisement -
- Advertisement -

सिनेपट | समिक्षण : मुंबईतील काॅर्पोरेट विश्वात नोकरी चाकरी करणारे दोन तरुण म्हणजे अजय आणि समीर. खरेतर दोघेही शिक्षणाने इंजिनिअर परंतु कंपनी पाॅलिसी आणि नोकरीची गरज म्हणून कंपनीच्या मार्केटिंगमध्येही त्यांचा सहभाग असणे हीच ती खरी चाकरी. कंपनीला दोघांच्याही इंजिनिअर असण्याचे सुख दुःख नसते तर त्यांच्याकडे असणार्या इंजिनिअरींगच्या ज्ञानाचा उपयोग कंपनीला मार्केटिंगसाठी अर्थात् उत्पादने विकण्यासाठी करायचा असतो हे उघड सत्य असते. पण दोघेही आपापल्या परीने अतिशय प्रामाणिकपणे त्यांची कामे करत असतात.

अजयला पगार फारसा नसतो परंतु आशा असते की एकदिवस स्वतःचा असा व्यवसाय सुरु करण्याची संधी त्याला मिळेल. त्याच्या शिक्षणासाठी वडिलांनी घेतलेले १६ लाखांचे कर्ज फेडण्यासाठीच त्याला त्याचे जीवन जगायचे असते. वडिल वेळोवेळी टोमणे मारत असतातच परंतु ते टोमणे प्रामाणीक प्रयत्न करुन तो पचवत असतो. परिसरातील एक दानशूर ‘भाई’ व्यक्तिमत्व त्याला व्यवसाय सुरु करायसाठी २० लाखांचे कर्ज द्यायचा वायदा देते. त्यामुळे अजयला त्याच्या स्टार्ट अपची चिंता नसते.

तिकडेच त्याचा इंजिनिअर मित्र समीर हा एका मल्टिनॅशनल कंपनीत झोनल मॅनेजर बनायच्या आशेने वीस वीस तास काम करुन त्याच्या बाॅसचे सगळे अगदी निमूटपणे ऐकत असतो. समीर हा अगदी भयानक गरजू नसला तरी त्याच्या प्रेयसीच्या म्हणजे शिल्पाच्या वडिलांसमोर काहीतरी पद घेऊन गेल्याशिवाय ते लग्नाला तयार होणार नाहीत हे जाणत असतो आणि तेच एकमेव त्याच्या मर मर नोकरी करण्यामागचे कारण असते.

नशिबाचे फासे उलटे पडतात आणि सगळे होत्याचे नव्हते होऊन बसते. अजयला स्टार्टअपसाठी पैसा मिळत नाहीच उलट असलेल्या नोकरीतील ग्राहक फोडल्याचा खोटा आळ त्याच्यावर येतो आणि नोकरीही जाते. समिरच्या ऐवजी झोनल मॅनेजर म्हणून बाॅसच्या मर्जीतील एका मुलीची निवड होते आणि त्यावर भडकलेला समीर नोकरीवर लाथ मारुन तिथून बाहेर पडतो.
अजयला त्याचे वडिल रागाच्या भरात घरातून बाहेर काढतात आणि समीरची शिल्पा त्याच्यापासून दुरावते.

आता नेमके काय करायचे असा विचार करताना दोघे आत्महत्येच्या निर्णयापर्यंत पोहोचतात. मुंबई बाहेर आत्महत्या करावी असा विचार करुन दोघे ट्रेनमध्ये चढतात आणि मनाला वाटलं तिथे उतरतात. दोघांच्या खिशात एकही रुपया नसतो. सलामतपूर गावात दोघेही उतरतात जे गांव ‘शेतकरी आत्महत्यांनी’ नटलेले असते. या गावाला, ५ हजार रुपयांच्या कर्जासाठी बॅन्कवाले तगादा लावतात म्हणून गावातील अनेक शेतकरी आत्महत्या करुन स्वतःला संपवून गेलेला ताजा इतिहास असतो. स्वतः आत्महत्या करायला आलेले अजय आणि समीर जेंव्हा ही परिस्थिती पहातात तेंव्हा त्यांना स्वतःच्या आत्महत्येच्या विचाराची लाज वाटते. दोघेही गावाला कर्जमुक्त करण्यासाठी गावासमोर ‘सहकारी शेतीचा’ पर्याय व आराखडा ठेवतात आणि त्यानंतर काय होते हे पहाण्याचा एक सिनेमा म्हणजे ‘मेरे देश की धर्ती..!’
‘सहकारी शेती’ हा शब्द किंवा संकल्पना प्रत्यक्षात अंमलात आणताना दोघांनी घेतलेले कष्ट, सोसलेला विरोध आणि प्रसंगी अजय व समीरमधील मतभेद या सर्वांचा परीणाम नेमका काय होतो ते ‘मेरे देशकी धर्ती’ हा सिनेमा पाह्यल्याशिवाय कळणार नाही.

दिव्येंदू शर्माने रंगवलेला ‘अजय’ आणि अनंत विधातने रंगवलेला ‘समीर’ ही दोन मुख्य पात्रे असणारा हा सिनेमा. अनुप्रीया गोयंका, इनामुल हक , बिजेंद्र काला, राजेश शर्मा, ॠतुजा शिंदे अशा तगड्या अस्सल अभिनेत्यांची फौज असलेला हा सिनेमा फराज़ हैजरने दिग्दर्शित केला असून पियुष मिश्रा यांचे संवाद व पटकथा आहे.
एमॅझाॅन प्राईमवर हा सिनेमा उपलब्ध आहे.

‘शेतकरी आत्महत्यांमागील’ या पिढीची कारणे, त्यावरील वैयक्तिक व सामूहीक उपाय या अनेक मुद्द्यांवर विचार मांडणारा हा सिनेमा आपण एमॅझाॅन प्राईमवर जरूर पहावा.

सिनेपट | आपली सिंधुनगरी चॅनेल

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

सिनेपट | समिक्षण : मुंबईतील काॅर्पोरेट विश्वात नोकरी चाकरी करणारे दोन तरुण म्हणजे अजय आणि समीर. खरेतर दोघेही शिक्षणाने इंजिनिअर परंतु कंपनी पाॅलिसी आणि नोकरीची गरज म्हणून कंपनीच्या मार्केटिंगमध्येही त्यांचा सहभाग असणे हीच ती खरी चाकरी. कंपनीला दोघांच्याही इंजिनिअर असण्याचे सुख दुःख नसते तर त्यांच्याकडे असणार्या इंजिनिअरींगच्या ज्ञानाचा उपयोग कंपनीला मार्केटिंगसाठी अर्थात् उत्पादने विकण्यासाठी करायचा असतो हे उघड सत्य असते. पण दोघेही आपापल्या परीने अतिशय प्रामाणिकपणे त्यांची कामे करत असतात.

अजयला पगार फारसा नसतो परंतु आशा असते की एकदिवस स्वतःचा असा व्यवसाय सुरु करण्याची संधी त्याला मिळेल. त्याच्या शिक्षणासाठी वडिलांनी घेतलेले १६ लाखांचे कर्ज फेडण्यासाठीच त्याला त्याचे जीवन जगायचे असते. वडिल वेळोवेळी टोमणे मारत असतातच परंतु ते टोमणे प्रामाणीक प्रयत्न करुन तो पचवत असतो. परिसरातील एक दानशूर 'भाई' व्यक्तिमत्व त्याला व्यवसाय सुरु करायसाठी २० लाखांचे कर्ज द्यायचा वायदा देते. त्यामुळे अजयला त्याच्या स्टार्ट अपची चिंता नसते.

तिकडेच त्याचा इंजिनिअर मित्र समीर हा एका मल्टिनॅशनल कंपनीत झोनल मॅनेजर बनायच्या आशेने वीस वीस तास काम करुन त्याच्या बाॅसचे सगळे अगदी निमूटपणे ऐकत असतो. समीर हा अगदी भयानक गरजू नसला तरी त्याच्या प्रेयसीच्या म्हणजे शिल्पाच्या वडिलांसमोर काहीतरी पद घेऊन गेल्याशिवाय ते लग्नाला तयार होणार नाहीत हे जाणत असतो आणि तेच एकमेव त्याच्या मर मर नोकरी करण्यामागचे कारण असते.

नशिबाचे फासे उलटे पडतात आणि सगळे होत्याचे नव्हते होऊन बसते. अजयला स्टार्टअपसाठी पैसा मिळत नाहीच उलट असलेल्या नोकरीतील ग्राहक फोडल्याचा खोटा आळ त्याच्यावर येतो आणि नोकरीही जाते. समिरच्या ऐवजी झोनल मॅनेजर म्हणून बाॅसच्या मर्जीतील एका मुलीची निवड होते आणि त्यावर भडकलेला समीर नोकरीवर लाथ मारुन तिथून बाहेर पडतो.
अजयला त्याचे वडिल रागाच्या भरात घरातून बाहेर काढतात आणि समीरची शिल्पा त्याच्यापासून दुरावते.

आता नेमके काय करायचे असा विचार करताना दोघे आत्महत्येच्या निर्णयापर्यंत पोहोचतात. मुंबई बाहेर आत्महत्या करावी असा विचार करुन दोघे ट्रेनमध्ये चढतात आणि मनाला वाटलं तिथे उतरतात. दोघांच्या खिशात एकही रुपया नसतो. सलामतपूर गावात दोघेही उतरतात जे गांव 'शेतकरी आत्महत्यांनी' नटलेले असते. या गावाला, ५ हजार रुपयांच्या कर्जासाठी बॅन्कवाले तगादा लावतात म्हणून गावातील अनेक शेतकरी आत्महत्या करुन स्वतःला संपवून गेलेला ताजा इतिहास असतो. स्वतः आत्महत्या करायला आलेले अजय आणि समीर जेंव्हा ही परिस्थिती पहातात तेंव्हा त्यांना स्वतःच्या आत्महत्येच्या विचाराची लाज वाटते. दोघेही गावाला कर्जमुक्त करण्यासाठी गावासमोर 'सहकारी शेतीचा' पर्याय व आराखडा ठेवतात आणि त्यानंतर काय होते हे पहाण्याचा एक सिनेमा म्हणजे 'मेरे देश की धर्ती..!'
'सहकारी शेती' हा शब्द किंवा संकल्पना प्रत्यक्षात अंमलात आणताना दोघांनी घेतलेले कष्ट, सोसलेला विरोध आणि प्रसंगी अजय व समीरमधील मतभेद या सर्वांचा परीणाम नेमका काय होतो ते 'मेरे देशकी धर्ती' हा सिनेमा पाह्यल्याशिवाय कळणार नाही.

दिव्येंदू शर्माने रंगवलेला 'अजय' आणि अनंत विधातने रंगवलेला 'समीर' ही दोन मुख्य पात्रे असणारा हा सिनेमा. अनुप्रीया गोयंका, इनामुल हक , बिजेंद्र काला, राजेश शर्मा, ॠतुजा शिंदे अशा तगड्या अस्सल अभिनेत्यांची फौज असलेला हा सिनेमा फराज़ हैजरने दिग्दर्शित केला असून पियुष मिश्रा यांचे संवाद व पटकथा आहे.
एमॅझाॅन प्राईमवर हा सिनेमा उपलब्ध आहे.

'शेतकरी आत्महत्यांमागील' या पिढीची कारणे, त्यावरील वैयक्तिक व सामूहीक उपाय या अनेक मुद्द्यांवर विचार मांडणारा हा सिनेमा आपण एमॅझाॅन प्राईमवर जरूर पहावा.

सिनेपट | आपली सिंधुनगरी चॅनेल

error: Content is protected !!