28.5 C
Mālvan
Saturday, September 21, 2024
Download Aarti Sangrah
ASN Ganapati AD
IMG-20240531-WA0007

विद्यार्थ्यांच्या महसूल विषयी कामांसाठी दर्पण प्रबोधिनी पाठीशी राहील ; अध्यक्ष आनंद तांबे यांचे प्रतिपादन.

- Advertisement -
- Advertisement -

मसुरे | प्रतिनिधी :
विद्यार्थ्यांना शासकीय कागदपत्रे,जातपडताळणी प्रमाणपत्र आणि इतर कागदपत्रांसंबंधी मार्गदर्शन व्हावे यासाठी दर्पण प्रबोधिनी सिंधुदुर्ग या सामाजिक संस्थेतर्फे व तहसीलदार कार्यालय कणकवली यांच्या सहकार्याने कणकवली महाविद्यालयाच्या एच.पी.सी.एल सभागृहात शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

दहावीनंतरच्या पुढील शिक्षणासाठी विविध प्रकारची शासकीय कागदपत्रे व दाखले आवश्यक असतात. ही कागदपत्रे व दाखले जमा करताना विद्यार्थ्यांना व त्यांच्या पालकांना शासकीय कार्यालयांचे हेलपाटे मारावे लागतात. हे हेलपाटे मारावे लागू नये म्हणून दर्पण प्रबोधिनी संघटनेने शालेय विद्यार्थ्यासाठी शासकीय कागदपत्रे मार्गदर्शन शिबीर आयोजित केले आहे. याचा विद्यार्थ्यांना लाभ घेऊन पुढील शिक्षणासाठी आवश्यक असणाऱ्या शासकीय कागदपत्रे व दाखल्यांची पूर्तता आतापासून करून ठेवावी. याकामी आमची संघटना तुम्हाला सर्वोतोपरी सहकार्य करेल, अशी ग्वाही दर्पण प्रबोधिनीचे अध्यक्ष आनंद तांबे यांनी यावेळी दिली.

या शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी कणकवली कॉलजेचे पर्यवेक्षक मंगलदास कांबळे, प्राध्यापक डॉ. सोमनाथ कदम, प्राध्यापिका सुषमा हरकुळकर, संघटनेचे सरचिटणीस सुभाष कदम, माजी पदाधिकारी व्ही. जी. कदम, संदेश कदम, तहसीलदार कार्यालयाचे पुणाजी वायंगणकर, अमित राऊळ आदी उपस्थित होते.श्री तांबे म्हणाले, शालेय, महाविद्यालयात शिकणारे बहुतांश विद्यार्थी ग्रामीण भागातील आहेत. अर्थात इंटरनेटची सुविधा, कागदपत्रांची पुरेशी माहिती नसल्याने त्यांना शासकीय कागदपत्रांच्या पूर्ततेसाठी तहसीलदार कार्यालयासह अन्य शासकीय कार्यालयांमध्ये कित्येक फेऱ्या माराव्या लागतात. या फेल्या विद्यार्थी व त्यांच्या पालकांना माराव्या लागू नये याकरिता मार्गदर्शनपर शिबिरातून आपणास सहजरित्या ही कागदपत्रे व दाखले उपलब्ध व्हावेत, हा संघटनेच्या उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले.
मंगलदास कांबळे म्हणाले, दर्पण प्रबोधिनीने शासकीय कागदपत्रे मार्गदर्शन शिबीर आयोजित केले आहे. याचा विद्यार्थ्यांनी लाभ घेऊन आपल्या पुढील शिक्षणासाठी लागणाऱ्या कागदपत्रे व दाखल्यांची पूर्तता आतापासून करून ठेवावी, असे आवाहन त्यांनी केले.सोमनाथ कदम म्हणाले, विद्यार्थ्यांना शासकीय कागदपत्रे, जातपडताळणी प्रमाणपत्र आणि इतर कागदपत्रासंबंधी मार्गदर्शन व्हावे याकरिता दर्पण प्रबोधिनीने आयोजित केलेल्या शिबिराचा उपक्रम स्तुत्य आहे.पुणाजी वायंगणकर व अमित राऊत यांनी शासकीय कागदपत्रे, जातपडताळणी प्रमाणपत्र आणि इतर कागदपत्रे जमा करण्यासाठी कोणकोणती कागदपत्रे व दाखले लागतात याची माहिती विद्यार्थ्यांना दिली. ही कागदपत्रे व दाखले विद्यार्थ्यांनी जमा करून ती प्रा. हरकुळकर यांच्याकडे जमा करावीत, अशी सूचना त्यांनी केली. सूत्रसंचालन किशोर कदम यांनी केले. आभार सुभाष कदम यांनी मानले. या
शिबिराला मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!