बांदा | राकेश परब :
बांदा येथील व्ही. एन. नाबर इंग्लिश मिडीयम स्कूल बांदा येथे बालदिन उत्साहात संपन्न झाला. यानिमित्ताने प्रशालेत विविध मनोरंजनात्मक खेळ व स्पर्धा घेण्यात आल्या. मुख्याध्यापिका सौ. मनाली देसाई यांनी विद्यार्थ्यांना बालदिनाचे महत्त्व विषद केले.
यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. मनाली देसाई यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने उद्घाटन झाले. तसेच माजी पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरु यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी विविध मनोरंजनात्मक खेळ घेण्यात आले. शाळेतील शिक्षकांनीही विविध कार्यक्रम मध्ये सहभाग घेतला होता.