25.6 C
Mālvan
Friday, September 20, 2024
Download Aarti Sangrah
ASN Ganapati AD
IMG-20240531-WA0007

आंगणे कुटुंबीयांनी मानले पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांचे आभार..!

- Advertisement -
- Advertisement -

आंगणेवाडीत येणाऱ्या भाविकांची गैरसोय दूर होणार – अध्यक्ष भास्कर आंगणे.

मसुरे | प्रतिनिधी : नवसाला पावणाऱ्या व लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या आंगणेवाडी येथील श्री भराडी देवी मंदिर परिसर व आंगणेवाडीचा नागरीसुविधा आणि विकास कामाद्वारे कायापालट होत आहे. यासाठी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री श्री. रवींद्र चव्हाण यांचे मोठे योगदान लाभत असल्या बद्दल आंगणेवाडी विकास मंडळ, मुंबईच्या वतीने अध्यक्ष भास्कर आंगणे, प्रमुख कार्यवाह मधुकर आंगणे यांनी प्रसिद्धी पत्रक काढत आभार मानले आहेत.
आंगणे कुटुंबियांचे स्नेही व महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री श्री रवींद्र चव्हाण यांनी पालकमंत्री पदाची सूत्रे हातात घेतल्यानंतर पहिल्याच दौऱ्यात आंगणेवाडी मध्ये आंगणे कुटुंबियांच्या श्री देवी भराडी मातेचे दर्शन घेतले व आंगणेवाडीच्या समस्या जाणून घेतल्या. शासकीय अधिकाऱ्यांना आंगणेवाडीतील विकास कामांसाठीचे सर्व प्रस्ताव तात्काळ तयार करण्याचे आदेश दिले. या कामासाठी निधी कमी पडू देणार नाही असे सांगत येणाऱ्या आंगणेवाडी जत्रेपूर्वी सर्व कामे पूर्णत्वाला न्यायची आहेत हा विचार करूनच कामाला लागा अशा सूचनाही दिल्या होत्या. पालकमंत्री यांनी आंगणेवाडी आणि आंगणेवाडी वासियांबद्दल आपुलकी दर्शवल्याबद्दल आंगणे कुटुंबिय, आंगणेवाडी व आंगणेवाडी विकास मंडळ मुंबई ने नामदार श्री रवींद्र चव्हाण यांचे प्रसिद्धी पत्रकाद्वारे मनःपूर्वक आभार मानले आहेत.
आंगणेवाडी विकास मंडळाने या कामात शासनास मंडळा मार्फत दिल्या जाणाऱ्या सहकार्यात सुसूत्रता यावी आणि काम व्यवस्थित आणि जलदगतीने व्हावे म्हणून मंडळाचे सहाय्यक कार्यवाह श्री अर्जुन सोमा आंगणे ऊर्फ काका आंगणे यांचे कडे या कामाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

प्रस्तावित विकासकामे –

आंगणेवाडी येथे येणाऱ्या यात्रेकरूंचा प्रवास अतिशय सुखकर व्हावा यासाठी महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाम मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार श्री रवींद्र चव्हाण यांच्या प्रयत्नातून जिल्हा परिषदेच्या ताब्यातील दोन इतर जिल्हा मार्ग व एक ग्रामीण मार्ग दर्जोन्नत करून सार्वजनिक बांधकाम विभागाने आपल्या ताब्यात घेतले आहेत. त्यापैकी काही महत्त्वपूर्ण रस्ते सिमेंट काँक्रीटचे बनविण्यात येणार असून त्यात आंगणेवाडी मार्गे जाणाऱ्या रस्त्याला महत्त्वपूर्ण दर्जा आणि प्राधान्य देऊन सिमेंट काँक्रीट मध्ये बनविण्याचे ठरविले आहे. यासाठी एशियन डेव्हलपमेंट बँकेची मदत घेण्यात येणार आहे. तसेच कुडाळ, मालवण व कणकवली येथून आंगणेवाडीत येणारे-जाणारे सर्व लहान मोठे रस्ते येणाऱ्या आंगणेवाडी जत्रेपूर्वी हॉट मिक्सींग डांबरीकरण करून मजबूत करण्यात
येणार असून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी वेगाने निर्णय घेऊन प्रशासकीय कामे सुरू केली आहेत.
जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार श्री रवींद्र चव्हाण यांनी आंगणेवाडी येथे येणाऱ्या सर्व रस्त्यांची कामे हाती घेतली असतानाच त्यासोबतच आंगणेवाडी परिसरात अत्याधुनिक सोयीसुविधा युक्त सुलभ शौचालय बांधणे, आंगणेवाडी येथे सुसज्ज दोन ते तीन बेडची शवदाहीनी व स्मशानशेड बांधणे, सर्व ओव्हरहेड विदयुत वाहिन्या भूमिगत करून ट्रान्सफॉर्मर शिफ्टिंग काम तसेच दोन जादा ट्रान्सफॉर्मर बसविणे व विद्युत सबस्टेशन करणे, आंगणेवाडी- मसुरे रस्त्यावर पथदीप, भोगलेवाडी येथील मोडण धरण परिसर तसेच पार्किंग परिसरात पथदीप बसविणे, आंगणेवाडी परिसरात कायमस्वरूपी नैसर्गिक पाण्याचा स्रोत असलेल्या मोडण झऱ्यावर तलाव बांधणे, सुसज्ज असे पर्यटक निवास बांधणे व मोबाईल सेवेसाठी जिओ मोबाईल टॉवर उभारणे इत्यादी प्रकल्प हाती घेतले असून पालक मंत्री नामदार श्री रवींद्र चव्हाण यांना ही सर्व लोकोपयोगी विकास कामे पूर्ण करण्यासाठी श्री देवी भराडी माता आशिर्वाद देऊन त्यांच्या पाठीशी निश्चितच उभी राहिल.
पालकमंत्री नामदार श्री रवींद्र चव्हाण यांनी भारतीय जनता पार्टीचे जिल्हा कार्यकारिणी सदस्य निलेश तेंडुलकर यांना सर्व शासकीय विभागाशी संपर्क करून विकास कामांबाबत सर्व आराखडे बनवून घेण्याची सूचना दिली होती. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता अनामिका जाधव, उपअभियंता अजित पाटील, शाखा अभियंता प्रदीप पाटील, महावितरणचे अभियंता श्री भगत, श्री मुगडे, मृद व जलसंधारण विभागाचे श्री भूषण नार्वेकर या सर्वांनी आंगणेवाडी परिसराची पहाणी करून माहिती घेतली. यावेळी भारतीय जनता पक्षाचे कोषाध्यक्ष श्री चारुदत्त देसाई, कुडाळ तालुका सरचिटणीस योगेश बेळणेकर, आंगणेवाडी विकास मंडळ मुंबईचे पदाधिकारी आणि आंगणेवाडी ग्रामस्थ श्री गजानन सिताराम आंगणे (बाबू), श्री नारायण विश्राम आंगणे, श्री सिताराम शांताराम आंगणे (बाळा), श्री अनंत आत्माराम आंगणे, श्री नंदकुमार भगवान आंगणे, श्री दिनेश दिगंबर आंगणे, श्री जयेश किर्तीराज आंगणे, श्री दत्तात्रय कृष्णाजी आंगणे, श्री तुषार चंद्रकांत आंगणे, श्री गणेश जयवंत आंगणे, श्री जयवंत पंढरी आंगणे, श्री देवेंद्र मारुती आंगणे, श्री किशोर बाळकृष्ण आंगणे, श्री महेश यशवंत आंगणे, श्री समीर सतीश आंगणे आणि ईतर आंगणे कुटूंबिय ग्रामस्थ व आंगणेवाडी विकास मंडळ, मुंबई कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.श्री भराडी देवी वरील असलेली श्रद्धा आणि आंगणेवाडीत येणाऱ्या लाखो भाविकांना सोई सुविधा पुरविण्यासाठी पालकमंत्रि रवींद्र चव्हाण प्राधान्याने देत असलेल्या योगदानाबद्दल आंगणे कुटुंबीयांनी आभार मानले आहेत.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

आंगणेवाडीत येणाऱ्या भाविकांची गैरसोय दूर होणार - अध्यक्ष भास्कर आंगणे.

मसुरे | प्रतिनिधी : नवसाला पावणाऱ्या व लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या आंगणेवाडी येथील श्री भराडी देवी मंदिर परिसर व आंगणेवाडीचा नागरीसुविधा आणि विकास कामाद्वारे कायापालट होत आहे. यासाठी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री श्री. रवींद्र चव्हाण यांचे मोठे योगदान लाभत असल्या बद्दल आंगणेवाडी विकास मंडळ, मुंबईच्या वतीने अध्यक्ष भास्कर आंगणे, प्रमुख कार्यवाह मधुकर आंगणे यांनी प्रसिद्धी पत्रक काढत आभार मानले आहेत.
आंगणे कुटुंबियांचे स्नेही व महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री श्री रवींद्र चव्हाण यांनी पालकमंत्री पदाची सूत्रे हातात घेतल्यानंतर पहिल्याच दौऱ्यात आंगणेवाडी मध्ये आंगणे कुटुंबियांच्या श्री देवी भराडी मातेचे दर्शन घेतले व आंगणेवाडीच्या समस्या जाणून घेतल्या. शासकीय अधिकाऱ्यांना आंगणेवाडीतील विकास कामांसाठीचे सर्व प्रस्ताव तात्काळ तयार करण्याचे आदेश दिले. या कामासाठी निधी कमी पडू देणार नाही असे सांगत येणाऱ्या आंगणेवाडी जत्रेपूर्वी सर्व कामे पूर्णत्वाला न्यायची आहेत हा विचार करूनच कामाला लागा अशा सूचनाही दिल्या होत्या. पालकमंत्री यांनी आंगणेवाडी आणि आंगणेवाडी वासियांबद्दल आपुलकी दर्शवल्याबद्दल आंगणे कुटुंबिय, आंगणेवाडी व आंगणेवाडी विकास मंडळ मुंबई ने नामदार श्री रवींद्र चव्हाण यांचे प्रसिद्धी पत्रकाद्वारे मनःपूर्वक आभार मानले आहेत.
आंगणेवाडी विकास मंडळाने या कामात शासनास मंडळा मार्फत दिल्या जाणाऱ्या सहकार्यात सुसूत्रता यावी आणि काम व्यवस्थित आणि जलदगतीने व्हावे म्हणून मंडळाचे सहाय्यक कार्यवाह श्री अर्जुन सोमा आंगणे ऊर्फ काका आंगणे यांचे कडे या कामाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

प्रस्तावित विकासकामे -

आंगणेवाडी येथे येणाऱ्या यात्रेकरूंचा प्रवास अतिशय सुखकर व्हावा यासाठी महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाम मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार श्री रवींद्र चव्हाण यांच्या प्रयत्नातून जिल्हा परिषदेच्या ताब्यातील दोन इतर जिल्हा मार्ग व एक ग्रामीण मार्ग दर्जोन्नत करून सार्वजनिक बांधकाम विभागाने आपल्या ताब्यात घेतले आहेत. त्यापैकी काही महत्त्वपूर्ण रस्ते सिमेंट काँक्रीटचे बनविण्यात येणार असून त्यात आंगणेवाडी मार्गे जाणाऱ्या रस्त्याला महत्त्वपूर्ण दर्जा आणि प्राधान्य देऊन सिमेंट काँक्रीट मध्ये बनविण्याचे ठरविले आहे. यासाठी एशियन डेव्हलपमेंट बँकेची मदत घेण्यात येणार आहे. तसेच कुडाळ, मालवण व कणकवली येथून आंगणेवाडीत येणारे-जाणारे सर्व लहान मोठे रस्ते येणाऱ्या आंगणेवाडी जत्रेपूर्वी हॉट मिक्सींग डांबरीकरण करून मजबूत करण्यात
येणार असून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी वेगाने निर्णय घेऊन प्रशासकीय कामे सुरू केली आहेत.
जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार श्री रवींद्र चव्हाण यांनी आंगणेवाडी येथे येणाऱ्या सर्व रस्त्यांची कामे हाती घेतली असतानाच त्यासोबतच आंगणेवाडी परिसरात अत्याधुनिक सोयीसुविधा युक्त सुलभ शौचालय बांधणे, आंगणेवाडी येथे सुसज्ज दोन ते तीन बेडची शवदाहीनी व स्मशानशेड बांधणे, सर्व ओव्हरहेड विदयुत वाहिन्या भूमिगत करून ट्रान्सफॉर्मर शिफ्टिंग काम तसेच दोन जादा ट्रान्सफॉर्मर बसविणे व विद्युत सबस्टेशन करणे, आंगणेवाडी- मसुरे रस्त्यावर पथदीप, भोगलेवाडी येथील मोडण धरण परिसर तसेच पार्किंग परिसरात पथदीप बसविणे, आंगणेवाडी परिसरात कायमस्वरूपी नैसर्गिक पाण्याचा स्रोत असलेल्या मोडण झऱ्यावर तलाव बांधणे, सुसज्ज असे पर्यटक निवास बांधणे व मोबाईल सेवेसाठी जिओ मोबाईल टॉवर उभारणे इत्यादी प्रकल्प हाती घेतले असून पालक मंत्री नामदार श्री रवींद्र चव्हाण यांना ही सर्व लोकोपयोगी विकास कामे पूर्ण करण्यासाठी श्री देवी भराडी माता आशिर्वाद देऊन त्यांच्या पाठीशी निश्चितच उभी राहिल.
पालकमंत्री नामदार श्री रवींद्र चव्हाण यांनी भारतीय जनता पार्टीचे जिल्हा कार्यकारिणी सदस्य निलेश तेंडुलकर यांना सर्व शासकीय विभागाशी संपर्क करून विकास कामांबाबत सर्व आराखडे बनवून घेण्याची सूचना दिली होती. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता अनामिका जाधव, उपअभियंता अजित पाटील, शाखा अभियंता प्रदीप पाटील, महावितरणचे अभियंता श्री भगत, श्री मुगडे, मृद व जलसंधारण विभागाचे श्री भूषण नार्वेकर या सर्वांनी आंगणेवाडी परिसराची पहाणी करून माहिती घेतली. यावेळी भारतीय जनता पक्षाचे कोषाध्यक्ष श्री चारुदत्त देसाई, कुडाळ तालुका सरचिटणीस योगेश बेळणेकर, आंगणेवाडी विकास मंडळ मुंबईचे पदाधिकारी आणि आंगणेवाडी ग्रामस्थ श्री गजानन सिताराम आंगणे (बाबू), श्री नारायण विश्राम आंगणे, श्री सिताराम शांताराम आंगणे (बाळा), श्री अनंत आत्माराम आंगणे, श्री नंदकुमार भगवान आंगणे, श्री दिनेश दिगंबर आंगणे, श्री जयेश किर्तीराज आंगणे, श्री दत्तात्रय कृष्णाजी आंगणे, श्री तुषार चंद्रकांत आंगणे, श्री गणेश जयवंत आंगणे, श्री जयवंत पंढरी आंगणे, श्री देवेंद्र मारुती आंगणे, श्री किशोर बाळकृष्ण आंगणे, श्री महेश यशवंत आंगणे, श्री समीर सतीश आंगणे आणि ईतर आंगणे कुटूंबिय ग्रामस्थ व आंगणेवाडी विकास मंडळ, मुंबई कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.श्री भराडी देवी वरील असलेली श्रद्धा आणि आंगणेवाडीत येणाऱ्या लाखो भाविकांना सोई सुविधा पुरविण्यासाठी पालकमंत्रि रवींद्र चव्हाण प्राधान्याने देत असलेल्या योगदानाबद्दल आंगणे कुटुंबीयांनी आभार मानले आहेत.

error: Content is protected !!