श्रावण | गणेश चव्हाण :
आचरा वरचीवाडी येथील श्रीम. मनोरमा ऊर्फ निराबाई बबन चव्हाण वय वर्ष८५ यांचे २१ ऑक्टोबरला कणकवली येथील खासगी रुग्णालयात ह्रदयविकाराने निधन झाले.
एका शिक्षकाच्या सुशिक्षित पत्नी असल्याने, आचरा परीसरात त्यांनी आपल्या ज्ञानाचा फायदा गोरगरीबांना करुन दिला. सतत दुसर्यांना कोणत्याही विषयी मार्गदर्शन करणार्या कै. मनोरमा बबन चव्हाण यांच्या पश्चात दोन मुलगे, सुना, चार मुली, जावई, नातवंडे, पुतणे, वहिणी व भाचे असा परीवार आहे. त्यांच्या निधनाने आचरा परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. आचरा अंगणवाडी सेवीका सौ. उषा चव्हाण यांची आई, सिंधुदुर्ग नाभिक संघटणेचे माजी जिल्हाध्यक्ष दिलीप चव्हाण यांच्या काकी तर मालवण नाभिक अध्यक्ष आनंद ग. आचरेकर यांच्या आत्त्या होत.