26.8 C
Mālvan
Thursday, September 19, 2024
Download Aarti Sangrah
ASN Ganapati AD
IMG-20240531-WA0007

नांदरूख येथे “आंबा पुनरुज्जीवन” माहिती कार्यशाळा संपन्न…!

- Advertisement -
- Advertisement -

मसुरे | प्राजक्ता पेडणेकर :

नांदरूख येथे कृषी विभाग मालवण व कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा,(आत्मा) यांच्या संयुक्त विद्यमानाने जिल्हाअंतर्गत प्रशिक्षण कार्यक्रमाच्या नुसार “आंबा पुनरुज्जीवन” माहिती कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
कोकणात डोंगरउतारावर वसलेल्या आंबा बागांमध्ये किड- रोगांचा प्रादुर्भाव दरवर्षी मोठ्याप्रमाणावर दिसून येतो. फवारणी करून देखील त्यांचे प्रमाण कमी होत नाही शिवाय बागांमधील झाडे अशक्त आहेत. त्यांच्यात फांद्या वाळण्याचे प्रमाण वाढले आहे आणि उत्पादकता देखील कमी आहे. म्हणून अश्या आंबा बागांचे पुनरुज्जीवन करणे गरजेचे आहे असे मत प्रादेशिक फळ संशोधन केंद्र वेंगुर्ला चे उद्यानविद्यावेत्ता डॉ श्री मिथीलेश सणस यांनी व्यक्त केले.
यावेळी कृषी विज्ञान केंद्राचे किटकशास्त्र विशेषज्ञ श्री बाळकृष्ण गावडे यांनी कीड – रोग व्यवस्थापन बाबत मार्गदर्शन केले.
सदर प्रशिक्षण नांदरुख पलिकडची वाडी येथील श्री प्रशांत पांडुरंग चव्हाण यांच्या बागेत घेण्यात आले. यावेळी गावचे सरपंच श्री दिनेश चव्हाण, मालवण तालुका कृषी अधिकारी व्ही.जी.गोसावी, कृषी पर्यवेक्षक मालवण डी. डी. गावडे, कृषी पर्यवेक्षक धामापूर ए. जी. परब, आत्मा समन्वयक श्री एन. एम. गोसावी, कृषी सहाय्यक नांदरूख श्रीम एस. व्ही. चौखंडे तसेच कोकण रत्न शेतकरी उत्पादक कंपनीचे अध्यक्ष श्री विलास चव्हाण व विभागीय व्यवस्थापक श्री रमाकांत सातार्डेकर तसेच आंबेरी, ना़दरुख, कातवड, देवली , चौके गावातील शेतकरी व महिला उपस्थीत होते.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

मसुरे | प्राजक्ता पेडणेकर :

नांदरूख येथे कृषी विभाग मालवण व कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा,(आत्मा) यांच्या संयुक्त विद्यमानाने जिल्हाअंतर्गत प्रशिक्षण कार्यक्रमाच्या नुसार "आंबा पुनरुज्जीवन" माहिती कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
कोकणात डोंगरउतारावर वसलेल्या आंबा बागांमध्ये किड- रोगांचा प्रादुर्भाव दरवर्षी मोठ्याप्रमाणावर दिसून येतो. फवारणी करून देखील त्यांचे प्रमाण कमी होत नाही शिवाय बागांमधील झाडे अशक्त आहेत. त्यांच्यात फांद्या वाळण्याचे प्रमाण वाढले आहे आणि उत्पादकता देखील कमी आहे. म्हणून अश्या आंबा बागांचे पुनरुज्जीवन करणे गरजेचे आहे असे मत प्रादेशिक फळ संशोधन केंद्र वेंगुर्ला चे उद्यानविद्यावेत्ता डॉ श्री मिथीलेश सणस यांनी व्यक्त केले.
यावेळी कृषी विज्ञान केंद्राचे किटकशास्त्र विशेषज्ञ श्री बाळकृष्ण गावडे यांनी कीड - रोग व्यवस्थापन बाबत मार्गदर्शन केले.
सदर प्रशिक्षण नांदरुख पलिकडची वाडी येथील श्री प्रशांत पांडुरंग चव्हाण यांच्या बागेत घेण्यात आले. यावेळी गावचे सरपंच श्री दिनेश चव्हाण, मालवण तालुका कृषी अधिकारी व्ही.जी.गोसावी, कृषी पर्यवेक्षक मालवण डी. डी. गावडे, कृषी पर्यवेक्षक धामापूर ए. जी. परब, आत्मा समन्वयक श्री एन. एम. गोसावी, कृषी सहाय्यक नांदरूख श्रीम एस. व्ही. चौखंडे तसेच कोकण रत्न शेतकरी उत्पादक कंपनीचे अध्यक्ष श्री विलास चव्हाण व विभागीय व्यवस्थापक श्री रमाकांत सातार्डेकर तसेच आंबेरी, ना़दरुख, कातवड, देवली , चौके गावातील शेतकरी व महिला उपस्थीत होते.

error: Content is protected !!